Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांची कुवैतमध्ये बिघडली तब्येत; शिष्टमंडळासोबत आहेत परदेश दौऱ्यावर!

Ghulam Nabi Azad health update : भाजप खासदार म्हणाले, आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचे डोळ्यात अश्रू आले होते.
Senior leader Ghulam Nabi Azad reportedly unwell during his official foreign visit to Kuwait, accompanied by a political delegation.
Senior leader Ghulam Nabi Azad reportedly unwell during his official foreign visit to Kuwait, accompanied by a political delegation. sarkarnama
Published on
Updated on

Ghulam Nabi Azad’s Health Deteriorates in Kuwait :  भारतीय खासदार आणि नेत्यांचे शिष्टमंडळ पाकिस्तानचा खोटारडेपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्यासाठी विविध देशांना भेट देत आहेत. ऑपरेशन सिंदूर का महत्त्वाचे होते आणि पाकिस्तान कशाप्रकारे दहशवाद्यांना पोसतो आहे, हे संपूर्ण जगाला भारत या माध्यमातून सांगत आहे.

दरम्यान या सर्वपक्षीय शिष्टमंडळात कुवेतला गेलेले जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) चे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांची प्रकृती अचानक बिघडली आहे.  गुलाम नबी आझाद आजारी पडले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना मंगळवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या कुवेत दौऱ्यादरम्यानच रुग्णालयात दाखल करावे लागले.

दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेले सर्व खासदारांनी त्यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतल्यानंतर, गुलाम नबी आझाद यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, अशी माहिती भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गुलाम नबी आझाद यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करता यावे यासाठी शिष्टमंडळासोबत जाण्याची तयारी दर्शवली होती, अशीही माहिती समोर आली आहे.

Senior leader Ghulam Nabi Azad reportedly unwell during his official foreign visit to Kuwait, accompanied by a political delegation.
Bangladesh political crisis : युद्धजन्य परिस्थिती!, युनूस यांचा हट्ट अन् लष्कराचा दबाव ; अखेर कोणत्या दिशेने जातोय बांगलादेश?

कुवेतला गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार बैजयंत पांडा हे करत आहेत, ज्यामध्ये गुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे. पांडा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून आझाद यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या भेटी दरम्यान गुलाम नबी आझाद यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे व ते वैद्यकीय देखरेखीत आहेत.

Senior leader Ghulam Nabi Azad reportedly unwell during his official foreign visit to Kuwait, accompanied by a political delegation.
India Vs Pakistan : मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त दणका; आता २३ जून पर्यंत...

याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की, गुलाम नबी आझाद यांचे बहरीन आणि कुवैतमध्ये झालेल्या बैठकांमध्ये प्रभावी योगदान होते. मात्र प्रकृती बिघडल्याने अंथरूणावर पडून रहावे लागत असल्याने सध्या ते निराश आहेत. सौदी अरेबिया व अल्जेरियामध्ये शिष्टमंडळात त्यांची आम्हाला उणीव भासले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com