
Yunus vs Military: The Power Struggle in Bangladesh : शेख हसीना यांना बांगलादेश सोडण्यास मजबूर केल्यानंतर आता बांगलादेशात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ घडणार असल्यचे दिसत आहे. कार्यवाहक सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या विरोधात सातत्याने अविश्वास वाढत आहे, ज्यामुळे बांगलादेशात अराजकतेचे वातावरण तयार झाले आहे. भारताकडे डोळे वटारून बघू पाहणाऱ्या बांगलादेशचे भविष्यच आता अंधारात दिसत आहे.
एकीकडे युनूस आपली गादी सोडण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे विरोधख आणि विद्यार्थी संघटनाना आता लवकरात लवकर निवडणूक हवी आहे. याशिवाय सैन्याने युनूस यांच्यावर दबाव वाढवला आहे, की पद सोडा आणि लवकरात लवकर निवडणूक घ्या. मात्र युनूस यांनी स्पष्ट केले आहे की ते सत्ता सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि जर दबाव टाकला गेला तर रस्त्यांवर पुन्हा एकदा विद्रोह उफाळू शकतो. खरंतर युनूस यांच्यासमोर आता मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व योजना धुळीस मिळताना दिसत आहेत.
खरंतरग मोहम्मद युनूस हे सद्यस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीत नाउमेद झाले आहेत. त्यांनी आपले मनातील दु:ख व्यक्त करत सांगितले की, जेव्हापासून सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीन यांचा पक्ष अवामी लीगवर प्रतिबंध लावले आहेत, तेव्हापासून देशात आणि बाहेर दोन्ही जागांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. युनूस यांनी राजकीय पक्षांसोबतच्या एका बैठकीत ही टिप्पणी केली होती.
बांगलादेशमधील वृत्तपत्र आलटलेट द डेली स्टारनुसार युनूस यांनी बांगलादेशात विविध राजकीय पक्षांसोबत आणि संघटनांच्या २० नेत्यांसोबत चर्चा केली. ही बैठक राजकीय अतिथीगृह, जमुना येथे दोन विविध सत्रांमध्ये झाली. बीएनपी, जमात-ए-इस्लामी आणि नॅशनल सिटीजन पक्षाच्या नेत्यांनी युनूस यांच्याशी वेगवेगळी भेट घेतली.
मोहम्मद युसूफ यांचे माध्यम सचिव शफीकुल आलम यांनी बैठकीदरम्यान प्रोफेसर युनूस यांच्या हवाल्याने म्हटले की, देशाच्या आता आणि बाहेर दोन्ही जागी युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. ज्याने आम्हाला पुढे जाण्यास रोखलं आहे, सर्वकाही उध्वस्त केले आहे.
विशेष म्हणजे या बैठका अशावेळी झाल्या जेव्हा युनूस हे सध्याच्या घडामोडींनी निराश होवून पद सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात होते. त्यांनी म्हटले होते की देशाला नुकसान पोहचले असे कोणतेही काम ते करणार नाहीत. त्यांनी म्हटले होते की, आपण सर्वजण सोबत बसलो तर मला विश्वास आहे, जर मी निष्पक्ष निवडणूक घेण्यात अपयशी ठरलो तर मी दोषी मानलो जाईल. शफीकुल यांनी सांगितले की, पक्ष नेत्यांनी युनूस यांचे म्हणणे ऐकले आणि अंतरिम सरकारसाठी आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.