Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांनी लोकसभा निवडणुकीतून घेतली माघार!

Anantnag Loksabha Constituency : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघातून दाखल केलेली उमेदवारी घेतली मागे
Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi AzadSarkarnama

Loksabha Election 2024 : डेमोक्रेटिक प्रोगेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर त्यांनी आपला उमेदवारी अर्जही मागे घेतली आहे. गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

गुलाम नबी आझाद(Ghulam Nabi Azad) यांनी 2022 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आहे. काँग्रेससोबतच आपले पाच दशकांहून अधिक काळाचे नाते संपुष्टात आणि त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. डेमोक्रेटिक प्रोगेसिव्ह आझाद पार्टी(डीपीएपी)असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ghulam Nabi Azad
Lalu Prasad Yadav : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादवांना धक्का! राष्ट्रीय उपाध्यक्षांनी सोडला पक्ष

आझाद यांनी लोकसभेची पहिली निवडणूक 1980 मध्ये महाराष्ट्रातील वाशीम लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत ते विजयीही झाले होते. त्यानंतर 1985 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर ते 2022 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. विशेष म्हणजे दोनदा महाराष्ट्रातूनच (Maharashtra)  ते राज्यसभेवर गेले होते.

केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी विविध मंत्रिपदांवरही काम केले आहे. ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. जम्मू आणि काश्मीर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांना संधी मिळाली. राज्यात 2005 मध्ये राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 2014 लोकसभा निवडणूक उधमपूर लोकसभा मतदारसंघामधून लढवली होती. परंतु तेव्हा भाजपचे नेते जितेंद्र सिंह यांच्याकडून ते पराभूत झाले होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते स्वत:च्या पक्षाकडून म्हणजे डीपीएपी कडून अनंतनाग-बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र आज त्यांनी अनंतनाग येथे त्यांच्या पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. शिवाय उमेदवारी अर्जही मागे घेतला आहे.

Ghulam Nabi Azad
Election Coimmission News : मतदारराजा जागा हाय..! तब्बल अडीच लाखांहून अधिक तक्रारींचा पाऊस

गुलाम नबी आझाद यांच्या या निर्णयामुळे आता अनंतनाग लोकसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. कारण भाजपकडून अद्यापही या मतदारसंघात उमेदवार जाहीर केला गेला नाही. भाजपच्या या भूमिकेमुळे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार ओमर अब्दुल्ला यांनी भाजपला पराभवाची जाणीव असल्याने, ते उमेदवार जाहीर करत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com