Goa Cabinet Reshuffle : गोवा मंत्रिमंडळात नवीन वर्षात होणार खांदेपालट? ; भाजप प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य चर्चेत!

Goa Vidhansabha News : गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून फेरबदलाची चर्चा सुरु आहे. लोकसभा आणि नंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आल्याने फेरबदलावर तोडगा निघाला नव्हता.
Goa Assembly
Goa AssemblySarkarnama
Published on
Updated on

Goa BJP News : डिसेंबरच्या अखेरीस गोव्यात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. जवळपास सहा मंत्री आणि नेत्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी केल्या. त्यामुळे लवकरच राज्यात मंत्रिमंडळात बदल होणार असे चित्र निर्माण झाले असताना वर्ष संपले तरी फेरबदल काही झाले नाहीत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांनी नव्या वर्षात फेरबदल होईल, असं वक्तव्य केल्याने आता २०२५ मध्ये फेरबदलाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

राज्यात लोकसभा(Loksabha) निवडणुकीच्या पूर्वीपासून फेरबदलाची चर्चा सुरु आहे. लोकसभा आणि नंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आल्याने फेरबदलावर तोडगा निघाला नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापनेला विलंब झाल्याने गोव्याचा निर्णय लांबणीवर पडला.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर गोव्यात फेरबदलाच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला. डिसेंबरमध्ये यासंबधित जोरदार घडमोडी घडल्या. याच काळात राज्यातील नेतृत्व बदलाची देखील चर्चा होऊ लागली.

Goa Assembly
BJP Vs Kejriwal News : 'मोहन भागवतांना पत्र पाठवण्यापेक्षा...' म्हणत भाजपचा केजरीवालांना टोला!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी तीन आमदारांसोबत चार्टरमधून दिल्ली गाठली होती. सावंत यांच्या या दिल्ली भेटीने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले. या भेटीनंतर पर्यटनमंत्री खंवटे यांनी आणि त्यापूर्वी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्लीत भेटीगाठी घेतल्या होत्या.

वर्षा अखेरपर्यंत राज्यात फेरबदल होईल, अशी शक्यता असताना त्यानंतर कोणत्याही हालचाली दिसल्या नाहीत. दरम्यान, खुद्द प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी फेरबदलाचे सूचक भाष्य केल्याने २०२५ मध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वाढली आहे.

Goa Assembly
Bansuri Swaraj Challenge Kejriwal : बांसुरी स्वराज यांचं अरविंद केजरीवालांना 'ओपन चॅलेंज', म्हणाल्या...

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा देखील झाल्या. परराज्यातून नेता आयात करुन राज्याचे नेतृत्व देण्याची शक्यता भाजपच्या(BJP) वरिष्ठ नेत्यांनी नाकारल्या आहेत. दरम्यान, फेरबदल होण्याबाबत प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सूचक वक्तव्य केल्याने लवकरच याला मुहूर्त लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com