BJP Vs Kejriwal News : 'मोहन भागवतांना पत्र पाठवण्यापेक्षा...' म्हणत भाजपचा केजरीवालांना टोला!

Sudhanshu Trivedi On Arvind Kejriwal : जाणून घ्या, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी नेमकं काय म्हटलं आहे? ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Sudhanshu Trivedi On Arvind Kejriwal
Sudhanshu Trivedi On Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

BJP on Arvind Kejriwal : भाजपने बुधवारी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांना टोला लगावला आहे. केजरीवालांनी केवळ मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून राजकीय चाल चालण्यापेक्षा त्यांनी या संघटनेचा सेवाभाव शिकला पाहिजे.

अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी सरसंघचालकांना पत्र लिहून विधानसभा निवडणुकीआधी भाजपवर उघडपणे पैसे वाटणे आणि दिल्लीतील मतदार यादीतून पूर्वांचली व दलित मतदारांचे नाव हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यावरून केजरीवालांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना भाजपच्या अशा चुकीच्या कृतीचे तुम्ही समर्थन करतात का? असा सवाल केला आहे.

यावर भाजपनेही(BJP) केजरीवालांना प्रत्यत्तर दिले आहे. राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आरोप केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेले पत्र म्हणजे केवळ माध्यमांचे लक्ष स्वत:कडे वेधण्याचा प्रयत्न आहे. पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्रिवेदी यांनी केजरीवालांना टोला लगावत म्हटले की, 'संघाकडून शिका, पत्र पाठवू नका.'

Sudhanshu Trivedi On Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी केजरीवालांचे मोहन भागवतांना पत्र; भाजपविषयी ‘हे’ प्रश्न केले उपस्थित...

त्रिवेदी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(RSS) संलग्न सेवा भारती ही भारतामधील सर्वात मोठी संस्था आहे. जी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या दलितांसह लोकांच्या कल्याणासाठी काम करते. तसेच त्यांनी म्हटले की, अशा संघटनांकडून (आसएसएस आणि त्याच्याशी संलग्न संघटना) सेवाभाव शिका, अशी राजकीय खेळी खेळू नका.

Sudhanshu Trivedi On Arvind Kejriwal
Bansuri Swaraj Challenge Kejriwal : बांसुरी स्वराज यांचं अरविंद केजरीवालांना 'ओपन चॅलेंज', म्हणाल्या...

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या(Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी सर्व पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. त्यातच आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com