Goa Congress and VBA News : गोवा काँग्रेस खासदार अन् अध्यक्षांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Goa Congress Politics News : गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्यावरुन देशभरात राजकीय पक्ष आणि भीमसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गोव्यात देखील काँग्रेसने आंदोलन करत निदर्शने केली होती.
Goa Congress and VBA News
Goa Congress and VBA NewsSarkarnama
Published on
Updated on

Goa Congress leader meets Prakash Ambedkar : गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. देश आणि राज्यातील राजकीय परिस्थिती आणि हालचालींवर यावेळी आंबेडकरांशी चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे.

पाटकर आणि फर्नांडिस यांच्यासोबत यावेळी नेते नितीन चोपडेकर देखील उपस्थित होते. डॉ. बाबसाहेब आंबेडकर कायम ज्यासाठी उभे राहिले अशा सामाजिक न्याय, समता आणि लोकशाहीच्या तत्त्वांना धोका निर्माण करणाऱ्या आव्हानांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसने(Congress) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सध्याची राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, उपेक्षित समुदायांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्याची तातडीची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. या बैठकीत सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या, विशेषत: वंचितांच्या प्रगतीसाठी प्राधान्य देणारी धोरणे अधोरेखित करण्यात आली, अशी माहिती काँग्रेसने दिली.

Goa Congress and VBA News
BJP Vs Congress : आंबेडकरांवरून काँग्रेस अन् भाजपमध्ये पुन्हा राडा; महापालिकेत नगरसेवक भिडले...

खासदार फर्नांडिस, अमित पाटकरांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण, काँग्रेसने ही भेट राजकीय नसल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहांनी राज्यसभेत संविधानावर चर्चा सुरु असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य केले होते. अमित शहांच्या(Amit Shah) वक्तव्यावरुन देशभरात राजकीय पक्ष आणि भीमसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गोव्यात देखील काँग्रेसने आंदोलन करत निदर्शने केली होती.

Goa Congress and VBA News
Rahul Gandhi : आता NHRC अध्यक्षांची नियुक्ती वादात; निवड समितीत असलेले खर्गे, राहुल गांधी भडकले

दरम्यान, माणिकराव ठाकरे हे गोवा राज्याचे काँग्रेसचे प्रभारी आहेत. त्यांनी काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा संदेश देण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच काँग्रेस नेत्यांमधील प्रखर मतभेद उघड झाले होते.

(Editedby - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com