Uttarakhand Election:भाजप 41, काँग्रेस २५ जागांवर आघाडीवर

तासाभरात ही आघाडी उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या बहुमतात बदलेल, असे हरीश रावत म्हणाले.
uttarakhand assembly election 2022
uttarakhand assembly election 2022sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. उत्तराखंडमध्ये भाजप 41, काँग्रेस 19 आणि अपक्ष उमेदवार 3 जागांवर आघाडीवर आहेत. (uttarakhand assembly election 2022)

खटीमा मतदारसंघातून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॉग्रेसचे भुवन चंद्र कापरी आघाडीवर आहेत.

''आम्ही बहुमताइतक्या जागा सहज जिंकत आहोत. जिथे आम्ही पिछाडीवर आहोत तिथे निकराची लढत आहे. तासाभरात ही आघाडी उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या बहुमतात बदलेल, असे हरीश रावत म्हणाले.

काँग्रेसच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने 2016 मध्ये काँग्रेसचे सरकार अस्थिर झाले होते. तशी परिस्तिथी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. २०१६ च्या निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी खेळलेला 'डाव' कॉग्रेस अजून विसरली नाही. त्यामुळे कॉग्रेसची नजर सर्व विधानसभा मतदार संघावर आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६चा आकडा गाठण्यासाठी भाजप-कॉग्रेसने देव पाण्यात ठेवले आहेत.

सध्या उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान झाले आहे. आज (गुरुवार) सकाळी मतमोजणीस सुरवात झाली आहे. दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक आतापासून वाढली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६चा आकडा गाठण्यासाठी भाजप-कॉग्रेसने प्रयत्नशील आहेत. (uttarakhand assembly election 2022)

uttarakhand assembly election 2022
Uttarakhand :भाजप अन् कॉग्रेसमध्ये ३६ चा आकडा ; कोण होणार मुख्यमंत्री?

सर्वांची नजर लालकुआं विधानसभा जागेवर आहे. कारण येथून माजी मुख्यमंत्री हरीश रावत (harish rawat) निवडणूक लढवित आहेत. निकालानंतर उत्तराखंडमध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली तर किंवा बहुमताच्या जवळ पोहचल्यावर आपल्या नवनिर्वाचित आमदारांना राजस्थान येथे रवाना करण्याची योजना आहे. यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. (uttarakhand assembly election news)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com