Goa Politics : भाजपच्या PWD मंत्र्यांची पक्षाकडूनच 'हिटविकेट'? गोव्यात मोठी राजकीय घडामोड...

Nilesh Kabral Suspended News : सायंकाळी गोव्यात शपथविधी होणार..
Goa Politics
Goa Politics Sarkarnama

Goa News : गोवा राज्यातून एक मोठी राडकीय घडामोड समोर येत आहे. गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत अभियंत्यांच्या ३४५ पदांच्या भरतीच्या कथित घोटाळा प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या घोटाळ्यांच्या आरोपामुळे आता थेट मंत्री नीलेश काब्राल यांना आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले आहे. पक्षश्रेष्ठींनी काब्राल यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व घडामोडीमुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Goa Politics
NCP-BJP : राष्ट्रवादी आमदाराच्या मतदारसंघातील समस्या सोडवली भाजपच्या माजी आमदाराने!

प्राप्त माहितीनुसार, आज गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (PWD Minister) यांना त्यांच्या पदावरून पायउतार होण्यास सांगितले आहे. त्यांच्या जागी आता आमदार आलेक्स सिक्वेरांचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

आलेक्स सिक्वेर म्हणाले, मागील एका वर्षापासून मला मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याबाबतच्या चर्चा मी ऐकत आलोय. पण माझ्या गळ्यात अजूनही मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. मला काँग्रेसची कार्यशैली, नेत्यांची कार्यपद्धती माहिती आहे. मात्र मी भाजपमध्ये नवीनच आहे. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय, मात्र मला मंत्रिपदाबाबत अद्यापही काही सांगितलं गेलं नाही.

Goa Politics
MNS Vs BJP News : मुंबई - गोवा महामार्गावरून राजकारण तापलं; 'चमकोमॅन' उल्लेख करत 'या' मनसे नेत्याने मंत्री चव्हाणांंना डिवचलं

दरम्यान, नीलेश काब्राल यांना आपल्या मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागणार या वृत्तामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. कुडचेमध्ये काब्रालांचे समर्थक एकवटले असून, आपल्या नेत्याला अपमानित व्हावे लागले, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com