Ahmednagar News : भाजपचे माजी आमदार तथा नगर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठे काम मार्गी लावत राजकीय खेळी खेळली आहे. सुपे औद्योगिक क्षेत्रातील भूसंपादन केलेल्या जमिनीवर कृषी कर्ज मिळण्यासाठी लादण्यात आलेले निर्बंध शिवाजी कर्डिले यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हटले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पारनेर तालुक्याती सुपे औद्योगिक क्षेत्रातील टप्पा दोन व तीनच्या विस्तीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. या जमिनीवर कृषी कर्ज मिळत नव्हते. जिल्हा सहकारी बँकेद्वारे विविध योजनेअंतर्गत कृषी कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. मात्र, भूसंपादनामुळे ते देण्यात येत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत मार्ग काढण्याची विनंती केली. राहुल शिंदे यांनी कर्डिले यांच्याकडे पाठपुरावा केला. कर्डिले यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रांताधिकारी गणेश राठोड यांच्याकडे यावर मार्ग काढावा, अशा सूचना केल्या.
भूसंपादन जमिनीवर शेतकऱ्यांना कसे कर्ज देता येईल, यावर मार्ग काढण्याची सूचना शिवाजी कर्डिले यांनी केली होती. बँकांकडून शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्राची सक्ती करता येणार नाही. शेतकऱ्यांना कृषीसह इतर कोणतेही कर्ज घेतले, तर गहाण खत बोजा याची नोंद तलाठी, मंडलाधिकारी यांनी इतर हक्कात करावी. यासाठी कोणतीही अडवणूक करू नये, असे आदेश प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिले आहे.
शिवाजी कर्डिले म्हणाले, "अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न होता. प्रांताधिकारी गणेश राठोड यांना यावर कायदेशीर मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यात यश आले आहे. कृषी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे".
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.