Gohana ka Jaleba : हरियाणात विधानसभा निवडणूक निकालाच्या चढ-उतारात 'गोहाना का जलेबा' ट्रेंडिंगमध्ये!

Haryana Vidhan Sabha Election Result and Gohana ka Jaleba : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण आणि काय या जलेबाची खासियत?
Haryana Gohana ka Jaleba
Haryana Gohana ka JalebaSarakarnama
Published on
Updated on

Haryana Assembly Election Results हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे आज निकाल लागत आहे, यामध्ये दोन्ही राज्यांमधील निकालचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. हरियाणात सुरुवातीस काँग्रेसच्या बाजूने गेलेला निकालाच कल नंतर भाजपच्या बाजून आला आणि भाजपने जोरदार मुसंडी मारत तिसऱ्यांदा हरियाणा सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष ठरला असून दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे.

एकीकडे सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्यांवर निकालचे अपडेट दिले जात होते, तर दुसरीकडे सोशल मीडियावर निकालावरून विविध प्रतिक्रिया उमट असताना, हरियाणातील गोहना का जलेबा ट्रेंडिंगमध्ये दिसू लागला आहे.

Haryana Gohana ka Jaleba
Haryana Election Result : हरियाणात प्रशासनावर दबाव, काँग्रेसला भलतीच शंका; निवडणूक आयोगाकडे तक्रार

खरंतर, 'जलेबा'ची ही कहानी हरियाणातील गोहाना येथून सुरू झाली होती. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना एक रॅलीत प्रसिद्ध 'मातूराम'च्या जलेबाचा डब्बा भेट दिला होता. त्यानंतर मंचावरून राहुल गांधींनी या जलेबाची भरपूर स्तुती केली आणि त्याच्या निर्यातीच्या शक्यतांवर चर्चा केली. त्यांनी हे देखील म्हटले की जर त्या एखाद्या मोठ्या कारखान्यात हे बनवलं गेल्या तर रोजगार वाढेल आणि देश-विदेशात त्याची निर्यातही होईल.

Haryana Gohana ka Jaleba
Haryana Election Results : भाजपची जोरदार मुसंडी; लाडू-जिलेबी वाटणाऱ्या काँग्रेसला धक्का

काँग्रेस नेते अतिउत्साहावरून जोरदार ट्र्रोल -

सोशल मीडियावर या वक्तव्यावरून राहुल गांधींना ट्रोल केलं गेलं आणि निवडणूक निकालादरम्यान जलेबा पुन्हा एकदा चर्चात आला. लोक निवडणूक निकालाची तुलना जलेबाच्या वाकड्या-तिकड्या आकारशी करू लागले आहेत. कारण, जसं सकाळी निकाल समोर येवू लागले तेव्हा काँग्रेस(Congress) आघाडीवर दिसत होती, त्यामुळे त्यांच्या काही अतिउत्साही नेते आणि कार्यकर्त्यांनी जिलबी वाटप सुरू केले होते.

मात्र दुपारनंतर निकालाचे चित्र पूर्णपणे पालटले आणि भाजपला बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोशल मीडियावर काँग्रेस आणि त्यांच्या अतिउत्साही नेते, कार्यकर्त्यांना आता जोरदार ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील अखिल भारती काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयातही सकाळी निवडणूक निकालाचा कल पाहून लाडू आणि जिलेबी वाटप केले गेलं, नंतर मात्र मुख्यालयात सामसूम दिसून आली.

'गोहना का जलेबा' का आहे प्रसिद्ध? -

गोहानाच्या या जलबाचा इतिहास फारच रंजक आहे. या व्यवसायाची सुरुवात मातूराम यांनी 1958मध्ये केली आणि आता यांना त्यांचे नातू रमन आणि नीरज गुप्ता हा व्यवसाय सांभाळत आहेत. या जिलब्या पूर्णपणे शुद्ध देशी तुपात बनवल्या जातात आणि या अन्य जिलबीच्या तुलनेत आकारने मोठ्या असतात, त्यामुळेच याला जलेबा असंही म्हटलं जातं. प्रत्येक जलेबाचं वजन जवळपास२५० ग्राम असतं. जलेबाच्या एका किलोच्या डब्ब्यात चार नग असतात, जो ३२० रुपयांना मिळतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com