केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खूषखबर, मोदी सरकार देणार होळी गिफ्ट!

केंद्र सरकार (Central Government) वर्षातून दोनदा (जानेवारी व जुलै) कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्यांचा आढावा घेते.
Prime minister Narendra Modi
Prime minister Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम व त्यामुळे गेले दीड वर्षे गोठविलेला महागाई भत्ता (DA) केंद्र सरकारी (Central Government) अधिकारी-कर्मचाऱयांना लवकरच मिळण्याची चिन्हे असून अर्थ मंत्रालयाने याबाबत ठोस हालचाली सुरू केल्या आहेत.

Prime minister Narendra Modi
'संजय राऊत माझे पैसे परत करा'

तसे झाल्यास या लाखो कर्मचाऱयांसह निवृत्तीवेतनधारकांनाही मोदी सरकारने दिलेली ही होळी गिफ्ट असेल. उत्तर भारतात होळी सणाचे विशेष महत्व असते. आजघडीला सुमारे ४८ लाख कर्मचारी व ६६ लाख निवृत्तीवेतनधारक केंद्रीय कर्मचारी व अधिकारी आहेत.

Prime minister Narendra Modi
video : मोदींच्या विरोधात बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांचा दबावगट

केंद्र सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी व जुलै) कर्मचाऱयांचे महागाई भत्ते यांचा आढावा घेते. सामान्यतः मार्च व सप्टेंबरमध्ये डीए व इतर भत्यांत वाढ करण्याची घोषणा केली जाते. मात्र कोरोना महामरीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका लक्षात घेता डिसेंबर २०१९ पासून केंद्रीय कर्मचाऱयांचे डीए सरकारने गोठविले होते.

तिसऱया लाटेला यशस्वीपणे तोंड देणाऱया देशाने आर्थिक आघाडीवरही दमदार वाटचाल सुरू ठेवल्याचा व २०२२-२३ च्या वर्षात देशाचा सकल विकास दर (GDP) साडेआठ टक्क्यांच्या आसपास झेपावेल,असा दावा सरकारने यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प व त्यापूर्वीच्या आर्थिक पाहणी अहवालातून केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com