'संजय राऊत माझे पैसे परत करा'

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Sanjay Raut, Mohit Kamboj
Sanjay Raut, Mohit Kambojsarkarnama

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी (ता.15 फेब्रुवारी) शिवसेना (Shivsena) भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. यामध्ये मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) घेऊन बुडवणार, असे म्हणत राऊत यांनी कंबोज यांच्यावर मोठा आरोप केला. तसेच, पत्राचाळीबद्दल बोलतांना ती जमीन खरेदी करणारा कंबोज असून पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे तिथेच गुंतले असल्याचा आरोप केला. तिथे कंबोजचाच प्रोजेक्ट सुरु असल्याचाही दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर कंबोज यांनी लगेचच पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडण करत राऊतांवर गंभीर आरोप केले आणि त्यांना आपण उसने पैसे दिल्याचा दावा केला होता. आज (ता.17 फेब्रुवारी) कंबोज यांनी राऊतांना माझे पैसे परत करा, अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातुन केली आहे.

Sanjay Raut, Mohit Kamboj
फडणविसांचा फ्रंटमॅन मोहित कंबोजकडून राऊतांनी उसने पैसे घेतलेत!

राऊत यांनी मंगऴवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चर्चा राज्यभर झाली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज, किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप केले होते. यानंतर भाजप नेत्यांनीही राऊतांवर टीकेची राळ उडवली होती. दरम्यान, कंबोज यांनी त्याच दिवशी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार टीका केली. आणि राऊत यांचा जमीन खरेदी प्रकरणात हात असून त्यात त्यांना किती पैशाचा कट मिळाला व गोल्ड स्मगलरसोबत तुमचे संबंध काय आहेत?, असे सवाल उपस्थित केले होते. तसेच, राऊत हे मला ओळखत नाही असे सांगत आहेत. मात्र, ते माझ्या घरी प्रत्येक वर्षी गणपतीला येतात, असे सांगत सोशल मिडियावर फोटो शेअर केले होते. आता कंबोज यांनी मंगळवारी उसने पैसे दिल्याच्या दाव्यानुसार राऊत यांच्याकडे आपले पैसे ट्विटरच्या माध्यमातुन वापस मागितले आहे.

Sanjay Raut, Mohit Kamboj
कोकणात कोण पराभूत होते, याचे उदय सामंतांनी गणित मांडले!

दरम्यान, कंबोज यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, राऊत म्हणतात की, मी मोहित कंबोजला ओळखत नाही. मात्र, ते 4 सप्टेंबर 2017 ला माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी गणपतीला येतात. जेव्हा त्यांना आर्थिक मदत लागली तेव्हा मी त्यांना मदतही केली आहे. माझ्यावर त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर मी देणार आहे. याबरोबर 175 एकर लँड खरेदी केली तो 5 हजार करोडचा हा व्यवहार आहे. प्रवीण राऊतला 700 कोटी मिळाले यात राऊतांना किती कट मिळाला. स्मग्लर लोकांसोबत तुमचे संबंध काय आहेत. राऊत यांनी कॅशमध्ये किती पैसे घेतले. गोल्ड स्मगलरसोबत तुमचे संबंध काय आहेत? राऊत आणि हयातचा काय संबंध? राजकुमार गुप्ता कोण हे देखील त्यांनी सांगावे. याबरोबर कोविड सेंटरमधील पार्टनरसोबत तुमचे काय संबंध आहेत,असे गंभीर आरोप कंबोज यांनी केले होते. हा वाद थांबण्याचे नाव घेत नसुन कंबोजने आता दिलेले उसने पैसे सोशल मिडियाच्या माध्यमातून परत मागितल्याने यावर राऊत आणि शिवसेना नेते काय उत्तर देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com