Sweet Issue: स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीनं एक लाडू कमी दिला! थेट मुख्यमंत्र्यांकडं केली तक्रार; अधिकारी झाले आवाक्

Sweet Issue : स्वातंत्र्यदिनी मिठाई वाटपाचा कार्यक्रम अनेक सरकारी कार्यालयांमध्ये घेतला जातो. त्याप्रमाणं एका ग्रामपंचायत कार्यालयात लाडू वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
AI Image_Independence Day
AI Image_Independence Day
Published on
Updated on

Sweet Issue: स्वातंत्र्यदिनी मिठाई वाटपाचा कार्यक्रम अनेक सरकारी कार्यालयांमध्ये घेतला जातो. त्याप्रमाणं एका ग्रामपंचायत कार्यालयात लाडू वाटपाचा कार्यक्रम पार पडला. पण या लाडू वाटपामुळं भलतंच संकट ओढवलं गेलं. प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील या गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागला. त्याचं कारण ठरलं फक्त एक लाडू. एक लाडू कमी पडल्यामुळं हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं आणि त्यानंतर बराच गोंधळ झाला.

AI Image_Independence Day
Ajit Pawar : अजितदादा वळून पाहतात अन् म्हणतात, I Love you too...; काय घडला प्रसंग जाणून घ्या?

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील नोधा गावच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. १५ ऑगस्ट रोजी या ग्रामपंचायतीनं ध्वजारोहणानंतर मिठाई म्हणून उपस्थित सर्व ग्रामस्थांना प्रत्येकी दोन दोन लाडूंचं वाटप केलं गेलं. पण या गावात राहणाऱ्या कमलेश कुशवाह याला फक्त एकच लाडू मिळाला. त्यामुळं नाराज झालेल्या कमलेशनं थेट मुख्यमंत्री हेल्पलाईनवर याची तक्रार केली. जशी ही तक्रार हेल्पलाईनवर आली आणि त्याची पडताळणी सुरु झाली तेव्हा हा विषय चर्चेचा विषय बनला. तक्रार दाखल झाल्यानंतर हा विषय मीडियापर्यंत पोहोचला. त्यानंतर ग्रामसेवक रविंद्र श्रीवास्तव यांनी जाहीर केलं की, तक्रारदार कमलेश कुशवाह यांना दोन लाडू दिले जातील.

AI Image_Independence Day
Flag Hoisting: स्वातंत्र्यदिनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फडकावला काँग्रेसचा झेंडा; व्हिडिओ व्हायरल होताच...

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना ग्रामसेवक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, कार्यक्रमात हजर असलेल्या प्रत्येक ग्रामस्थाला एक-एकच लाडू देण्यात आला होता. पण जेव्हा कमलेशनं एक अतिरिक्त लाडू मागितला तर त्याला कर्मचाऱ्यानं नकार दिला. यामुळं तो नाराज झाला आणि त्यानं थेट मुख्यमंत्री हेल्पलाईनवर तक्रार दाखल केली. पण आता या तक्रारीचं निवारण करण्यासाठी ग्रामपंचायतीतील बाजारातून एक किलो लाडूचा डब्बा खरेदी करुन तो कमलेशला उपलब्ध करुन दिला जाईल, असं ग्रामसेवकांनी जाहीर केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com