खानापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ता. २७ फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे झालेल्या रोड-शो व सभेला गेलेले एक आजोबा पुन्हा घरी परत आलेच नाहीत, त्यामुळे आमच्या आजोबाचा शोध घ्या, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी खानापूर पोलिस स्थानकात केली आहे. (Grandfather who went to Modi's Sabha is missing)
याबाबत मिळालेली माहिती की, बेळगाव येथे गेल्या २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व रोड शो झाला. या सभेसाठी जांबोटी येथील मारुती गोविंद देसाई (वय ७०) हे आजोबा गेले होते. परंतु गेले १० ते ११ दिवस झाले ते पुन्हा परत आलेच नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ता. २७ फेब्रुवारी रोजी बेळगाव, येडियुराप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे मोठी सभा झाली. लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक उपस्थित होते. त्यामध्ये मारुती देसाई हे आजोबाही सहभागी झाले होते. पण त्या सभेनंतर ते घरी परत आलेच नाहीत. त्यांच्या घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही, त्यामुळे देसाई यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी खानापूर पोलीस स्थानकात धाव घेऊन परिस्थितीची माहिती दिली.
खानापूर पोलिसांत अद्याप यासंदर्भात रीतसर बेपत्ता झाल्याची नोंद झाली नसली तरी त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनुसार पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली आहे. छायाचित्राची मिळतीजुळती व्यक्ती आढळल्यास खानापूर पोलिस स्थानकात संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.