Adhalrao Patil News : राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबाबत बोललो; म्हणून माझ्या गाड्या अडविणार का? आढळरावांचा सवाल

पुणे जिल्हा परिषदेच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झालेला असून त्याची चौकशी लावणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

राजगुरूनगर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत बोललो; म्हणून मला खेड तालुक्यात फिरू न देण्याची भाषा म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत, असे प्रत्युत्तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी दिले. पुणे जिल्हा परिषदेच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झालेला असून त्याची चौकशी लावणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. (Talked about NCP's corruption; So will my cars be blocked?: Shivajirao Adhalrao Patil)

खेड तालुक्यातील वाकळवाडी येथे एका सभामंडप शेडच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत आढळराव यांनी दोषारोप केल्यानंतर गुरूवारी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आढळराव बदनामी करत असल्याचे आरोप करीत त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यासंदर्भात आज (ता. १० मार्च) आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Shivajirao Adhalrao Patil
Leopard Safari : शिवजन्मभूमीमध्येच होणार बिबट सफारी; फडणवीसांच्या घोषणेने बारामती की जुन्नर प्रश्न मिटला

ते म्हणाले, 'निर्मला पानसरे यांच्याबद्दल आजवर मी कधी ब्र शब्दही बोललो नाही. वाकळवाडीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोललो. मग महिला पदाधिकाऱ्यांचा आदर याचा अर्थ सरकारी निधीची होळी झाली तरी बोलायचे नाही का? त्यांची दुष्कृत्ये दिसली तरी डोळे बंद करून घ्यायचे, अशी त्यांची अपेक्षा आहे का? महिला असल्याच्या आड लपून गैरव्यवहार करणे योग्य नाही.'

Shivajirao Adhalrao Patil
Help For Bjp's Sugar Factories: राज्यातील सात भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मिळणार १०३१ कोटींचे कर्ज : हे आहेत नेते....

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबाबत बोललो म्हणून माझ्या गाड्या अडविणार का? मी १५ वर्षे खासदार होतो, माझ्यावर जो नगरपरिषदेला पडला, त्याने बोलावे एवढी त्याची लायकी आहे का? पोरखेळ किंवा वात्रटपणा किती? अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांचे नाव न घेता केली.

पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांनी खेड तालुक्यातील दूध गढूळ केले, असे ते म्हणाले. मी मतदारसंघात पंतप्रधान सडक योजनेचे जाळे उभारले. पुणे-नाशिक महामार्गाच्या नूतनीकरणाचे मोठे काम केले. राजगुरूनगरचा पर्यायी पूल आणि हुतात्मा स्मृतीशिल्पही मी उभारले. आता १४ कोटींची पंचायत समितीची इमारत उभी राहत आहे. खेडची प्रशासकीय इमारतही मीच करणार, असे आढळराव म्हणाले.

Shivajirao Adhalrao Patil
Budget Session : तुम्हीही शिंदेंच्या गटात जावा अन॒ त्यांच्या यादीतून तुमच्या कारखान्यांचा नंबर लावा : अजितदादा विधानसभेत असं का म्हणाले?

‘...तर राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची बॅंड लावून मिरवणूक काढू’

पुन्हा आढळराव पाटलांना खेड तालुक्यात फिरू न देण्याची भाषा केल्यास तालुकाध्यक्षाच्या घरासमोर बँड लावून त्यांची मिरवणूक काढू. स्वतःचे पद वाचविण्यासाठी ते आमदार मोहिते यांची टिमकी वाजवत आहेत. ज्यांनी कात्रज दूधाची फॅट वाढवून लाखो रूपये कमावले, त्या चांभारेंनी आढळरावांवर बोलू नये. राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी टक्केवारी घेऊन आणि कामांचे तुकडे पाडून कामे केली, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com