Gujarat Assembly Election : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संध्याकाळी 5 वाजता संपले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 58.68 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. अंतिम टक्केवारी येणे बाकी आहे. (Gujarat Assembly Election Exit Poll News)
मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल समोर येत आहेत. त्यामध्ये गुजरातसाठी टीव्ही 9 ने केलेल्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करु शकते. भाजपला 125-130, काँग्रेस 40 ते 50, आप 3-5, इतर 3 ते 7, जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात गुजरातमध्ये 62.68 टक्के मतदान झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात साबरकांठा येथे सर्वाधिक 57.23% आणि सर्वात कमी मतदान अहमदाबादमध्ये 44.67% नोंदवले गेले आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 25 दशलक्ष मतदार 833 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही शहरांपेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी अहमदाबादमधील राणीप भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानासाठी पंतप्रधान पोहोचल्यावर ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. या वेळी सर्वत्र मोदी-मोदीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होती. गृहमंत्री अमित शाह यांनीही सकाळी 10.45 च्या सुमारास अहमदाबादमधील नारनपुरा मतदान केंद्रावर मतदान केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.