Osmanabad : महापुरुषांच्या अपमानाचा भाजपकडून ठरवून करेक्ट कार्यक्रम..

Sushma Andhare : यात्रेत मी प्रश्न, मुद्दे उपस्थित करीत आहे, त्याचे उत्तर मिळण्याऐवजी एकेरी टिका होत आहे.
Sushma Andhare News, Osmanabad
Sushma Andhare News, OsmanabadSarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : कृती कार्यक्रम, विकासाच्या मुद्यावर फेल ठरलेल्या भाजपाने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ठरवुन महापुरूषांचा अपमान करण्याचा करेक्ट कार्यक्रम आखला आहे, असा आरोप Shivsena शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे सोमवारी (ता. पाच) उमरग्यात आल्या होत्या.

Sushma Andhare News, Osmanabad
Marathwada : नाना पुढाकार घ्या, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना राईट करा..

शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाप्रबोधन यात्रेची संकल्पना सांगितली. राष्ट्र पुरुष, महापुरुषांच्या कर्तत्वाची महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा आहे, मात्र भाजपाच्या घाणेरड्या राजकारणामुळे संस्कृतीला गालबोट लागत आहे. (Osmanabad) त्यामुळे धर्मनिरपेक्षता, अखंडतेच्या विचाराचे बिजारोपन पुन्हा एकदा करण्याची गरज असल्याने नेमकी ति भूमिका घेऊन प्रबोधन यात्रेत विचारमंथन होत आहे. (Marathwada)

यात्रेत मी प्रश्न, मुद्दे उपस्थित करीत आहे, त्याचे उत्तर मिळण्याऐवजी एकेरी टिका होत आहे. भाऊ, दादा, आण्णा, काका म्हणुन प्रश्न विचारत असताना विरोधक मात्र माझा "बाई" म्हणुन उल्लेख करतात, याचा अर्थ त्यांचे नेतृत्व, कर्तत्व आणि संस्काराची ओळख महाराष्ट्राला होत आहे. माझ्या शारीरिक उंचीवर चर्चा करण्यापेक्षा बौद्धिक उंचीने आमने - सामने चर्चा करायला या, मी जर हरले तर तुमचे शिष्यत्व स्विकारेन, असे आव्हानही अंधारे यांनी भाजप व मनसेच्या नेत्यांना दिले.

मनसेचे प्रकाश महाजन यांच्या आरोपाला बगल देत त्यांनी प्रमोद महाजन यांच्या कुशल नेतृत्वाचा संदर्भ दिला. महाजन- मुंढे याचं अतूट नातं आहे. त्याच विचारसरणीतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र माजी मंत्री पंकजा मुंढे यांच्यावर राजकिय कुरघोडी करत आहेत. तर भाची म्हणून प्रकाश महाजन यांना देखील काहीच वाटत नाही, अशी टीका देखील त्यांनी केली.

एकेकाळी मी शिवसेनेची टिकाकार होते मात्र आता शिवसेनेचे जीव तोडून काम करीत आहे. अत्यंत संयमी, मितभाषी असलेले उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टिका करणाऱ्या विरोधकांच्या बुद्धिची किव येते. मुख्यमंत्रीपदी महिलेला स्थान देण्याचे सुतोवाच ठाकरे यांनी केल्याने आपला आशावाद आहे का ? या प्रश्नावर त्या हसून म्हणाल्या, मी शिवसैनिक आहे आणि शेंडीफळ आहे. पदापेक्षा काम करत रहाण्याला प्राधान्य देणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com