Gujarat Election Results : गुजरात निवडणुकीत केजरीवालांना 3 धक्के, तर 3 मोठे दिलासे!

Arvind Kejriwal News: गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि येथेही आपची दाणादाण उडाली.
Gujrat Election
Gujrat Election Sarkarnama

Gujarat Election : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला. भाजपने काँग्रेसचा 1985 मध्ये जिंकलेल्या 149 जागा विक्रम मोडून पहिल्यांदाच 150 चा टप्पा पार केला आहे. यावेळी काँग्रेसला 20 पेक्षा कमी जागा मिळाल्या. आम आदमी पक्षाच्या अपेक्षांनाही मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना गुजरातमध्ये तीन धक्के बसले, तर तीन दिलासादायक गोष्टी आपसाठी घडून आल्या आहेत.

आपचा अपेक्षाभंग :

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या सहा महिन्यांत गुजरातमध्ये आक्रमकपणे प्रचार केला आणि आपल्या पक्षाला गुजरातध्ये तिरंगी लढतीचं चित्र निर्माण केलं होतं. केजरीवालांनी दावा केला हो लेखी दावा केला होता की, त्यांचा पक्ष 92 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. मात्र, मतमोजणीत या अपेक्षा पार धुळीला मिळाल्या. पक्षाला 5 जागांवर समाधान मानावे लागले.

आपचे दोन चेहरे पराभवाच्या उंबरठ्यावर :

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे नेतृत्व करणारे गोपाल इटालिया पराभूत होण्याच्या मार्गावर आहेत. सुरतच्या कतारगाम मतदारसंघातून ते भाजपच्या उमेदवाराविरुद्ध मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. त्याचवेळी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी हेही खंभलिया मतदारसंघातून पराभवाच्या उंबरठ्यावरआहेत.

Gujrat Election
Himachal Pradesh Results 2022 : CM जयराम ठाकूर यांचा रेकॉर्ड, सातव्यांदा जिंकले

हिंदुत्वाच्या ट्रॅकला धक्का :

अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या निवडणुकीत पहिल्यांदाच 'हिंदुत्व' कार्डाचा खुल्या पद्धतीने वापर केला. निवडणुकीपूर्वी ते गुजरातच्या अनेक मंदिरांमध्ये पूजा करताना दिसले. टिळा आणि रुद्राक्षच्या माध्यमातून त्यांची नवी प्रतिमा निर्माण करण्याचाही प्रयत्न केला गेला. नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाच्या चित्राची मागणी करून त्यांनी राजकीय पंडितांनाही हैराण केले. मात्र, केजरीवालांचा हा डाव यशस्वी झाला नाही.

राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा करा :

मात्र, गुजरातमध्ये पराभूत होऊनही एका गोष्ट आम आदमी पक्षाने साध्य केले आहे. 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्ली, पंजाब आणि गोव्यात प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळवलेल्या 'आप'ला गुजरातमध्ये 12 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. अशा परिस्थितीत आता गुजरात राज्यातही 'आप'ला प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळणार आहे. 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

Gujrat Election
Gujarat Election 2022 Updates : भाजप ऐतिहासिक विजयाच्या वाटेवर..

मतांच्या टक्केवारीत प्रोत्साहन मिळेल :

मतदान होईपर्यंत अरविंद केजरीवाल बहुमताचा दावा करत असले तरी, एक्झिट पोलनंतर त्यांनीही आपला पक्ष सरकार स्थापन करणार नसल्याचे मान्य केले. मात्र, त्यांच्या पक्षाला 15-20 टक्के मते मिळाली तर ती मोठी गोष्ट ठरेल, असेही ते म्हणाले. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि येथेही आपची दाणादाण उडाली असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र मिळालेली मतांनी, त्याची प्रतिमा राष्ट्रीय नेत्याची होण्याला मदत आहे.

पश्चिम भारतात प्रवेश :

2017 साली, गुजरातमध्ये 29 जागांवर निवडणूक लढविणाऱ्या सर्व आप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. आता दुसऱ्या प्रयत्नात पक्षाने थेट विधानसभेत प्रवेश केला आहे. यासह पक्षाने पश्चिम भारतात प्रवेश केला आहे. यापूर्वी दिल्ली, पंजाब आणि गोव्यात पक्षाचे प्रतिनिधित्व आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com