(Hardik Patel Latest News)
गांधीनगर : गुजरात काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी अखेर काँग्रेसला रामराम केला आहे. पटेल मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. आज ट्विट करुन त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Hardik Patel resigns from Congress membership)
आपल्या ट्विटमध्ये हार्दिक पटेल म्हणाले, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन. (Hardik Patel resigns from Congress membership)
यापूर्वीही हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जाहीर टीका आणि भाजपच उघड कौतुक केले होते. तसेच त्यांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या डीपीमुळेही चर्चांना अधिक हवा मिळाली होती. हार्दिक पटेलांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम डीपीमधून काँग्रेस गायब झाले होते. त्याजागी भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो आला होता. अलिकडेच त्यांच्या ट्विटर बायोमधूनही काँग्रेस गायब झाले होते. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले होते.
भाजपचे कौतुक करताना काय म्हणाले होते हार्दिक पटेल?
भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.
पटेल यांचे काँग्रेसवर आरोप :
पटेल यांनी नुकताच पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळेच गुजरातमध्ये काँग्रेसमधून ते बाहेर पडू शकतात, अशा चर्चांना सुरूवात झाली होती. एकूणच काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच हार्दिक पटेल यांची भेट घेवून त्यांची समजूत काढली होती.
काँग्रेसमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पटेल यांना कामाच्या स्वातंत्र्याबाबत विश्वास देण्यात होता. तसेच लवकरच त्यांना नवी जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेले मतभेद दूर करण्यासाठी हार्दिक यांच्या संपर्कात राहण्याचे आदेशही राहुल गांधी यांनी पक्षश्रेष्ठींना दिले होते. याबाबत काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी माहिती दिली होती. याशिवाय हार्दिक पटेलांशी पक्षश्रेष्ठींची काय चर्चा झाली याबाबत गुजरात काँग्रेसचे प्रभारी रघू शर्मा हे माहिती देतील, असेही सुरजेवाला यांनी सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.