MLA Gurpreet Gogi : धक्कादायक! आम आदमी पार्टीच्या आमदाराचा गोळी लागून मृत्यू

AAP MLA Punjab shot dead : पंजाबमधील लुधियाना विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
MLA Gurpreet Gogi
MLA Gurpreet GogiSarkarnama
Published on
Updated on

Punjab News, 11 Jan : पंजाबमधील (Punjab) लुधियाना विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

गोळी लागल्यानंतर गोगी यांना डीएमसी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर पुलिस आयुक्त जसकरण सिंह तेजा यांनी आमदार गुरप्रीत गोगी यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला.

जसकरण सिंह यांनी सांगितलं की, आमदार गोगी यांना मृत अवस्थेत डीएमसी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना रात्री शुक्रवारी (ता.10) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगितलं शिवाय त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

तर गोगी यांनी 2022 मध्ये आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या लुधियाना विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दोन वेळा आमदार राहिलेल्या भारत भूषण आशू यांचा पराभव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com