नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh)यांने राजकीय मैदानावर नवी इनिंग सुरु केली आहे. पंजाबमधून तो आम आदमी पक्षाच्या (AAP) माध्यमातून खासदारपदी विराजमान होत आहेत. क्रिकेटमधून राजकारणात आलेला हरभजन सिंग याने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. त्याने याबाबतची माहिती टि्वटवरुन दिली आहे. (Harbhajan Singh News Updates)
हरभजन सिंग याने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून शेतकरी बांधवांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशात इतर खासदारांनी देखील असा आदर्श उभा केल्यास लाखो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, अशी चर्चा सध्या सोशलमीडियावर रंगली आहे.
''राज्यसभा सदस्य म्हणून मी माझा राज्यसभेचा पगार (rajya sabha salary)शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी देत आहे. आपला देश अधिक चांगला व्हावा यासाठी मला योगदान द्यायचे आहे आणि मी जे काही करू शकतो ते करेन,'' असं हरभजन सिंग याने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
४१ वर्षीय हरभजन सिंग याने गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर तो पंजाबमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत अनेक वेळा दिसला. तेव्हा भज्जी लवकरच काँग्रेस किंवा भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे झाले नाही. त्याने आम आदमी पक्षात प्रवेश केला. तो पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann)यांच्या जवळचा असल्याचे बोललं जाते.
अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने २०११ च्या विश्वचषकात ९ विकेट्स घेतल्या होत्या आणि २००७ च्या टी २० विश्वचषकात ७ विकेट्स घेत महत्वाची भूमिका बजावली होती. हरभजनची क्रिकेट कारकीर्द २३ वर्षांची आहे. सध्या तो आयपीएल २०२२ च्या मोसमात कॉमेंट्री करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.