Former CM Car Accident : नशीब बलवत्तर....एअरबॅग उघडली अन्‌ माजी मुख्यमंत्री थोडक्यात बचावले!

अपघात झाला त्यावेळी भूपेंद्र सिंह हुड्डा हे गाडीत पुढील सीटवर बसले होते.
Bhupendra Singh Hooda
Bhupendra Singh HoodaSarkarnama

हरियाणा : ज्येष्ठ काँग्रेस (Congrss) नेते तथा हरियाणाचे (Hariyana) माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या गाडीला हिसार जिल्ह्यात अपघात झाल्याचे पुढे आले आहे. या अपघातात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला असून गाडीतील एअरबॅग उघडल्यामुळे माजी मुख्यमंत्री हुड्डा हे थोडक्यात बचावले. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात रविवारी (ता. ९ एप्रिल) सकाळी ही घटना घडली आहे. (Hariyana's Former Chief Minister Bhupendra Singh Hooda's car accident)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपची विजेती स्वीटी बुरा हिचे हिसारच्या घिरईमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हिसार येथे जात होते. यादरम्यान ते मतलौदा गावाजवळ पोहोचले असता त्यांच्या गाडीसमोर अचानक एक नील गाय आली. त्यावेळी हुड्डा यांची कार नील गाईला जोरात धडकली.

Bhupendra Singh Hooda
Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार; पण मोजक्या जागांवर : शरद पवारांची घोषणा

भूपेंद्र सिंह हुड्डा यांची कार निलगायीला धडकल्यानंतर कारच्या एअरबॅग उघडल्या. त्यामुळे समोर बसलेले माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा थोडक्यात बचावले. यानंतर त्याला दुसऱ्या वाहनात पाठवण्यात आले. अपघात झाला त्यावेळी भूपेंद्र सिंह हुड्डा हे गाडीत पुढील सीटवर बसले होते. अपघातानंतर माजी मुख्यमंत्री दुसऱ्या वाहनाने घिराये गावात कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निघाले.

Bhupendra Singh Hooda
Baramati Lok Sabha : बारामतीत शंभर टक्के कमळ फुलणार : केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा भोरमध्ये दावा

कारमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासोबत माजी मंत्री जयप्रकाश, वीरेंद्र सिंह, धरमवीर गोयत, नरेश सेलवाल हे देखील होते. मात्र, कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघाताबाबत हिसारचे पोलिस अधीक्षक गंगा राम पुनिया यांनी सांगितले की, ‘अचानक एक नीलगाय रस्त्यावर आली आणि माजी मुख्यमंत्री हुड्डा यांच्या वाहनाला धडकली.

Bhupendra Singh Hooda
Shivijaro Adhalrao Patil News : चंद्रकांतदादांनी कोल्हेंबाबत संकेत देताच आढळरावांकडून ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात!

आम्ही सर्वजण सुरक्षित : भूपेंद्र सिंह हुड्डा

माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा या अपघातसंदर्भात म्हणाले की, नील गाईने आमच्या गाडीला धडक दिली. मात्र आम्ही सर्वजण सुरक्षित आहेत. मी माझे पुढील कार्यक्रम सुरू ठेवत आहे आणि एका कार्यक्रमासाठी गावी जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com