Haryana Assembly Election : मायावतींचे उत्तराधिकारी आकाश आनंद यांचा पहिला डाव; भाजपसह काँग्रेसला देणार धक्का?

Mayawati Akash Anand BSP INLD Alliance : हरियाणामध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी बसपा आणि इंडियन नॅशनल लोकदलामध्ये आघाडी झाली आहे.
Mayawati, Akash Anand
Mayawati, Akash AnandSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांचे उत्तराधिकारी आकाश आनंद यांना पहिलं यश मिळालं आहे. हरियाणातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत बसपाने राज्यातील इंडियन नॅशनल लोक दलाशी आघाडी केली आहे. या आघाडीसाठी झालेल्या चर्चेमध्ये आकाश यांचा सक्रीय सहभाग होता.

चंदीगडमध्ये गुरूवारी INLD चे नेते अभय चौटाला आणि आकाश आनंद यांनी आघाडीची घोषणा केली. त्यामुळे आता ही आघाडी सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला टक्कर देईल. आघाडीमध्ये बसपा 37 तर आयएनएलडी 53 जागांवर निवडणूक लढणार आहे.

Mayawati, Akash Anand
Rahul Gandhi : राहुल गांधींना थप्पड मारली पाहिजे म्हणणाऱ्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री कोण?

आकाश आनंद यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नाचेही उत्तर दिले. अभय चौटाला हे मुख्यमंत्रिपदाची प्रमुख दावेदार असणार आहेत. केवळ विधानसबेची निवडणूक नव्हे तर पुढील काळात राज्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी ही आघाडी कायम राहणार असल्याचे आकाश यांनी स्पष्ट केले.

Mayawati, Akash Anand
Lok Sabha Election Result : लोकसभेच्या निकालातून भाजपसह काँग्रेसलाही रेड अलर्ट!

ज्येष्ठांना पेन्शन, मोफत सिलेंडर

आघाडीचा सत्ता आल्यास राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 7500 रुपायंची पेंशन दिली जाईल. तसेच पाणी मोफत दिले जाणार असून वीजबील 500 रुपयांपेक्षा जास्त येणार नाही, अशी व्यवस्था केली जाईल. तर गृहिणींसाठीही दर महिन्याला एक गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा चौटाला यांनी यावळी केली.

आघाडीच्या घोषणेनंतर मायावती यांनीही एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, आम्ही निवडणुकीत जनविरोधी पक्षांना हरवून आघाडीचे सरकार बनविण्याचा संकल्प घेऊन लढू. नवी दिल्लीतील माझ्या निवासस्थानी आघाडीबाबत चर्चा झाली. आघाडीमध्ये सर्वबाबतीत सहमती झाली आहे. त्यामुळे आमची आघाडी राज्यात सरकार बनवेल, असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com