Election Results : काँग्रेस नेत्यांसाठी मुख्यमंत्रिपद ठरणार काटेरी मुकुट; कोण कुणाला देणार झटका?

Haryana Assembly Election 2024 Congress Bhupinder Hooda Kumari Selja : हरियाणामध्ये मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
Haryana Election
Haryana ElectionSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : हरियाणामध्ये एक्झिट पोलचे अंदाज समोर येताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. तसे पाहिले तर निवडणुकीची घोषणा होण्याआधीच माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा आणि खासदार कुमारी शैलजा यांच्यामध्ये काँटे की टक्कर सुरू झाली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद कोणत्याही नेत्याला मिळाले तरी हे पद काटेरी मुकुट ठरणार, हे निश्चित.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ काही तास उरले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, काँग्रेस पुन्हा दहा वर्षांनी सत्तेत येणार आहे. प्रत्यक्षात निकाल काय लागतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालेल्या काँग्रेससाठी हरियाणातील विजय आत्मविश्वास वाढवणार ठरणार आहे. पण त्याचवेळी नेत्यांमधील गटबाजीही काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार आहे.

Haryana Election
Assembly Election 2024 : भाजपची सत्ता ‘या’ सहा कारणांमुळे जाणार; काँग्रेसनंही संधीचं सोनं केलं...

हुडा आणि शैलजा यांच्यासह खासदार रणदीप सिंह सुरजेवाला हेही मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्य आहेत. मी अजून थकलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही, असे म्हणत हुडांनी आपली दावेदारी ठोकली आहे. तर शैलजा यांनी दलित कार्ड खेळले आहे. सुरजेवालांची दावेदारी दिल्लीश्वरांवर अवलंबून आहे.

निकालाच्या एक दिवस आधीच हुडा दिल्लीत दाखल झाले होते. निवडून आलेल्या आमदारांचे मत जाणून घेत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा, असे साकडे त्यांनी पक्षश्रेष्ठींना घातले असावे. कारण तिकीटवाटपात हुडांचे समर्थक उमेदवार अधिक होते. शैलजा यांचा या प्रक्रियेला विरोध आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींनीच निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

Haryana Election
Jammu-Kashmir Election : सत्तेची चावी नायब राज्यपालांच्या हाती; का वाढली ‘काँग्रेस-एनसी’ची धडधड?

दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेली रस्सीखेच काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरू शकते. राज्यात काँग्रेसचे किती आमदार निवडून येणार, यावरही बरेच गणित अवलंबून आहे. काठावर बहुमत मिळाल्यास बंडखोरीची टांगती तलवार पक्षाच्या डोक्यावर असेल. अशा स्थितीत भाजप फोडा आणि राज्य करा, ही नीती अवलंबू शकते. त्यामुळे काँग्रेसला सावध राहावे लागेल. मुख्यमंत्र्यांची खरी कसोटी यावेळी लागणार आहे. कारण काँग्रेससाठी मध्य प्रदेश आणि राजस्थानातील अनुभव धडा शिकवणारा ठरला होता.

दोन-तृतीयांश किंवा त्याच्या जवळपास बहुमत मिळाल्यास काँग्रेसला बंडखोरीची भीती फारशी सतावणार नाही. एक्झिट पोलमधून अशीच काहीशी स्थिती असली तरी प्रत्यक्ष निकाल काय लागणार, हे पाहणे महत्वाचे असेल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार, यावर हरियाणातील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. त्याचप्रमाणे देशातील पुढील काही महिन्यांत इतर राज्यांत होणाऱ्या निवडणुकांवरही त्याचा परिणाम होईल, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com