Rahul Gandhi : राहुल गांधींनी हरियाणात एका झटक्यात निवडणुकीचं वारं फिरवलं; 'या' कृतीतून काँग्रेसला सुखद धक्का

Haryana Assembly Election Congress Kumari Selja Bhupinder Singh Hooda : हरियाणात कुमारी शैलजा आणि भूपिंदरसिंह हुडा यांच्यातील राजकीय संघर्ष निवडणुकीदरम्यान उफाळून आला आहे.
Haryana Assembly Election, Rahul Gandhi
Haryana Assembly Election, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : हरियाणामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा आणि खासदार कुमारी शैलजा यांच्यामधील संघर्षाचा पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भर सभेतील कृतीमुळे निवडणुकीचे वारे फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राहुल गांधी यांची सोमवारी अंबाला येथे प्रचारसभा झाली. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होते. सभेदरम्यान व्यासपीठावर राहुल यांच्या एका बाजुला हुडा आणि दुसऱ्या बाजुला शैलजा कुमारी होत्या. सभेला उपस्थित मतदारांना हात उंचावून अभिवादन करताना राहुल यांनी तत्परता दाखवली.

Haryana Assembly Election, Rahul Gandhi
Tirupati Laddu Case : तिरुपती लाडू प्रकरण चंद्राबाबूंच्याच अंगलट; सुप्रीम कोर्टाने फटकारले...

कुमारी शैलजा आणि हुडा यांच्या नकळत त्या दोघांचे हात पकडून मिळवले. दोघांचे हात धरत त्यांनी पक्षातील गटबाजी संपुष्टात आल्याचा संदेश उपस्थितांसह हरियाणा काँग्रेसलाही देण्याचा प्रयत्न केला. हरियाणा काँग्रेसकडूनही सोशल मीडियातून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. याचा निश्चितपणे निवडणुकीत काँग्रेससाठी सकारात्मक परिणाम होईल, अशा आशा नेत्यांना आहे.

शैलजा यांची नाराजी दूर?

उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर कुमारी शैलजा यांनी प्रचारातून माघार घेत दिल्ली गाठली होती. जवळपास 10-12 दिवस त्या प्रचारापासून लांब राहिल्याने पक्षातील गटबाजी उघड झाली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. पण त्यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, हे सांगताना त्यांनी हुडा यांच्याविषयीची आपली नाराजी जाहीरपणे सांगितली होती.

Haryana Assembly Election, Rahul Gandhi
Tirupati Laddu Case : तिरुपती लाडू प्रकरण चंद्राबाबूंच्याच अंगलट; सुप्रीम कोर्टाने फटकारले...

हरियाणामध्ये 20 ते 22 टक्के दलित मतदार आहेत. शैलजा कुमारी या दलित नेत्या असल्याने त्यांची नाराजी काँग्रेसला परवडणारी नव्हती. त्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच प्रचारात पुन्हा सक्रीय करण्यात आले. आता मतदानासाठी केवळ चारच दिवस उरलेले असल्याने प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशावेळी राहुल यांनी पक्षातील नेत्यांमध्ये एकजुटता दाखविण्याची संधी सोमवारी साधली. आता याचा पक्षाला निवडणुकीत किती फायदा होणार, हे 8 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com