माजी मुख्यमंत्र्यांना दणका! गेल्याच वर्षी तुरुंगातून सुटल्यानंतर आता पुन्हा शिक्षा होणार

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाचा माजी मुख्यमंत्र्यांना दणका
Om Prakash Chautala
Om Prakash ChautalaSarkarnama

नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयानं (Court) माजी मुख्यमंत्र्यांना दणका दिला आहे. हरियानाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे (INLD) प्रमुख ओमप्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. चौटाला यांना 26 मे रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. विशेष म्हणजे, चौटाला यांची दहा वर्षांचा तुरूंगवास भोगल्यानंतर गेल्या वर्षीच सुटका झाली होती.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालय 26 मे रोजी निकाल सुनावणार आहे. या निकालाच्या सुनावणीवेळी ओमप्रकाश चौटाला यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात निर्णय राखून ठेवला होता. आता या प्रकरणात न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. चौटाला यांना दोषी धरण्यात आल्यानं त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी होणार हे निश्चित मानले जात आहे.

Om Prakash Chautala
संभाजीराजेंचा गेम होणार? भाजपच्या प्रवीण दरेकरांनी दिले वेगळेच संकेत

शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौटाला यांनी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर गेल्या वर्षी चौटाला यांची सुटका झाली होती. शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौटाला यांची 2013 मध्ये तुरुंगात रवानगी झाली होती. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. चौटाला यांच्यासोबत त्यांचे पुत्र अजय चौटाला आणि इतर 53 जणांना 2000 मध्ये हरियाणातील 3 हजार 206 कनिष्ठ मूलभूत शिक्षकांच्या बेकायदा भरतीसाठी दोषी ठरवण्यात आल होतं. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जानेवारी 2013 मध्ये या सर्वांना वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

Om Prakash Chautala
शेअर बाजारात मोठा घोटाळा; सीबीआयची देशभरात दहा शहरांत एकाच वेळी छापेमारी

ओमप्रकाश चौटाला हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी हरियाणा बोर्डातून दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. माजी मुख्यमंत्री चौटाला यांनी 2021 मध्ये हरियाना ओपन बोर्डमधून बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, तोपर्यंत ते दहावीच्या इंग्रजी विषयात उत्तीर्ण न झाल्यानं त्यांचा निकाल रोखण्यात आला होता. गेल्या वर्षी दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये त्यांनी 100 पैकी 88 गुण मिळवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com