संभाजीराजेंचा गेम होणार? भाजपच्या प्रवीण दरेकरांनी दिले वेगळेच संकेत

संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकारण तापलं
Pravin Darekar and Sambhajiraje Chhatrapati
Pravin Darekar and Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळं राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. अशातच राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा केलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. यामुळं त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) वेगळेच संकेत दिले आहेत.

महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांचा गेम करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे, असं विधान दरेकरांनी केलं आहे. यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरेकर म्हणाले की, राज्यसभेसाठी संभाजीराजेंबाबत महाविकास आघाडी सरकारची भूमिका एकाने मारल्यासारखं कर आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं कर, अशी आहे. आधी पवारसाहेबांनी पाठिंबा जाहीर केला पण त्यांनी सर्वांचं मत विचारात घेऊन पाठिंबा जाहीर केला होता का? कारण नंतर संजय राऊतांनी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करणार असल्याचं जाहीर केलं. संभाजीराजेंनी शिवसेनेचा झेंडा घ्यावा, प्रचार करावा, अशा अटी उद्धव ठाकरेंनी घातल्या आहेत. पण हा संभाजीराजेंचा गेम करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्याना पडला आहे. संभाजीराजेंना भाजपने सन्मानाने खासदारकी दिली आणि त्यासाठी त्यांना आम्ही कधीही अटी घातल्या नव्हत्या. ते छत्रपतींचे वारस आहेत त्यामुळे त्यांना अटी आणि चौकटीत बसवणे योग्य नाही.

Pravin Darekar and Sambhajiraje Chhatrapati
शेअर बाजारात मोठा घोटाळा; सीबीआयची देशभरात दहा शहरांत एकाच वेळी छापेमारी

राज्यसभेच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येऊ शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे मंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.

Pravin Darekar and Sambhajiraje Chhatrapati
शिवसेनेचा दे धक्का! राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला पुण्यात पाडणार खिंडार

सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना लढविणार असल्याने शिवसेनेने उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वीच संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे. ही ऑफर अद्यापही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. याच ऑफरच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्याची चर्चा होती. (Rajysabha Election latest news)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com