Chief Minister News : हरियाणा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ठरले; नेत्यांकडून मोठी घोषणा

Haryana Jammu and Kashmir Assembly Election Results : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निकालानंतर कुणाची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे.
Haryana, Jammi-Kashmir Chief Minster
Haryana, Jammi-Kashmir Chief MinsterSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही राज्यांत अनुक्रमे इंडिया आघाडी आणि भाजपने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कुणालाही टेकूची गरज भासणार नाही.

हरियाणामध्ये भाजपने स्वबळावर बहुमत गाठत इतिहास घडवला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत पक्षाचे 50 उमेदवार आघाडीवर होते. ही निवडणूक काळजीवाहू मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. त्यांना निवडणुकी आधी जेमतेम 200 दिवसांसाठी हे पद मिळाले. या संधीचे सोने करीत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले आहे.

Haryana, Jammi-Kashmir Chief Minster
Election Results 2024 LIVE : विनेश फोगाटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, काँग्रेसचे...

हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बदोली यांनी सैनी हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे जाहीर करून टाकले आहे. मुख्यमंत्री बदलणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे छत्तीसगड विधानसभेचाच फॉर्म्यूला भाजपकडून हरियाणातही राबवला जाणार हे निश्चित आहे. उत्तराखंडमध्ये विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडेही निवडणुकीच्या काही दिवस आधी हे पद आले होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण भाजपने त्यांनाच मुख्यमंत्री केले आणि पोटनिवडणुकीत निवडूनही आणले.

काश्मीरमध्ये अब्दुला सरकार

जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीने बहुमत मिळवले आहे. आघाडीला 90 पैकी जवळपास 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जवळपास 42 जागा एकट्या एनसीला मिळू शकतात.

Haryana, Jammi-Kashmir Chief Minster
Vinesh Phogat Won : बहिणीला जे जमलं नाही ते विनेशनं करून दाखवलं! विधानसभेत थाटात एन्ट्री

एनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे केंद्र सरकारने कलम 370 हटवल्याच्या निर्णयाला विरोधामुळे मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असेही फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दहा वर्षानंतर राज्यात पुन्हा एकदा अब्दुल्ला राज सुरू होणार आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com