Tripura MLAs Suspended: महाराष्ट्रानंतर त्रिपुरातही राजकारण तापलं; पाच आमदारांचं तडकाफडकी निलंबन

Tripura Legislative Assembly News: त्रिपुरा विधानसभेत गदारोळ, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय
Tripura Legislative Assembly News
Tripura Legislative Assembly NewsSarkarnama
Published on
Updated on

Political News: महाराष्ट्रात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रानंतर त्रिपुरामध्येही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्रिपुरात आजपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाला आहे.

या गदारोळांतर पाच आमदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता त्रिपुरातही राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. त्रिपुरामध्ये आजपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे.

Tripura Legislative Assembly News
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : आढळराव शरद पवारांच्या संपर्कात? पण त्या दरवाजाच्या चाव्या माझ्याकडेच; कोल्हेंचा खळबळजनक दावा

या अधिवेशनामध्ये भाजप आणि टिपरा मोथा पार्टीच्या आमदारांमध्ये सभागृहातच मोठा गदारोळ झाला. दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये आधी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद वाढला आणि आमदारांनी सभागृहात थेट टेबलवर चढत गोंधळ घातला. या गदारोळामुळे त्रिपुराच्या अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला.

टिपरा मोथाचे आमदार अनिमेश देबबर्मा यांनी विधानसभेत भाजपचे एक आमदार पॉर्न पाहत असल्याचा आरोप करत प्रश्न उपस्थित केला. पण यानंतर सभागृह अध्यक्षांनी हा प्रश्न फेटाळून लावत दुसऱ्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास सांगितलं.

मात्र, यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजीने सभागृह दणाणले. यानंतर याचे रूपांतर गदारोळात झाले. काही आमदारांनी तर टेबलावर चढून याचा विरोध केला. या विधानसभेत गदारोळ केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी पाच आमदारांना निलंबित केलं.

Tripura Legislative Assembly News
Praful Patel Press Conference : राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीत नियमांची पायमल्ली ; प्रफुल्ल पटेलांनी वाढवलं पवारांचं टेन्शन

कोणत्या पाच आमदारांना निलंबन?

दरम्यान, यामध्ये आमदार नयन सरकार, काँग्रेसचे सुदीप रॉय बर्मन, टिपरा मोथाच्या बृस्वकेतु देबबर्मा, नंदिता रियांग आणि रंजीत देबबर्मा या तीन आमदरांना निलंबित केलं. यानंतर सभापतींनी केलेल्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. या गदारोळाप्रकरणी अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com