Praful Patel Press Conference :
Praful Patel Press Conference : Sarkarnama

Praful Patel Press Conference : राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीत नियमांची पायमल्ली ; प्रफुल्ल पटेलांनी वाढवलं पवारांचं टेन्शन

NCP Crisis : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यासंदर्भात संभ्रम निर्माण केला जात आहे
Published on

Praful Patel on Delhi Meeting : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यासंदर्भात संभ्रम निर्माण केला जात आहे, चुकीची माहिती पसरवली जात आहे. पण ३० जूनला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली, त्या बैठकीत अनेक लोक उपस्थित होते. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी' या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे खूप आमदार बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याच वेळी आम्ही सर्वांनी, सर्वांनुमते अजित पवार यांची आपला नेता म्हणून निवड केली.

याच दिवशी आम्ही दोन-तीन प्रक्रिया पूर्ण केल्या. यातील पहिली अजित पवार यांनी माझी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. दुसरी त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून त्यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली. तिसरी, अनिल पाटील यांची विधीमंडळाचे प्रतोद म्हणून नियुक्ती केली. तर अमोल मिटकरी यांची विधानपरिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना पत्राद्वारे या गोष्टींची माहितीही दिली.

Praful Patel Press Conference :
Pankaja Munde Statement: विधान परिषदेचा फॉर्म भरायच्या आधी दहा मिनिटं फोन आला अन् सांगितलं..; पंकजा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

महत्त्वाचं म्हणजे ३० तारखेलाच आमदारांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांच्या नावाने याचिका दाखल करण्यात आली. म्हणजे ३० तारखेपासून हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. असही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. आम्हाला पक्ष म्हणून मान्यता द्यावी, नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी आयोगाकडे मागणी केली आहे. हे स्प्लिट नाही, पक्षाचे बहुमत अजित पवार यांना आहे. बहुमताने अजित पवार यांची पक्षनेता म्हणून निवड केली आहे. यासाठी याचिकाही दाखल केली आहे.

Praful Patel Press Conference :
Nagpur NCP News : शरद पवारांनी उद्घाटन केलेल्या ‘या’ कार्यालयातून चालणार ‘दादा’ गटाचे कामकाज !

तसेच, हे सर्व सांगत असताना काल, दिल्लीत एक बैठक झाली, मी त्याला दुसरं नाव देणार नाही, पण ती अधिकृत बैठक नव्हती. आमचं एक संविधान राहणार आहे. कोणताही पक्ष नोंदणी झाल्यानंतर त्याचे संविधान आणि नियम असतात. हे संविधानानुसार, प्रक्रिया पार पडली. पक्षाचं बहुमत अजित पवारांच्या पाठीशी आहे. अजित पवार हेच आमचे नेते आहेत. कोणत्याही नेत्यावर अपात्रता लागू होणार नाही, असही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

सप्टेंबर २०२२ झालेले अधिवेशन आणि कालची दिल्लीत झालेली बैठक माझ्या स्वाक्षरीने मी राज्याचे प्रमुख निवडले आहेत. पण ते निवडणुक घेऊन निवडलेले नाहीत. शरद पवार यांची ती अधिकृत बैठक नाही, माझ्या स्वाक्षरीने गेला असला तरी माझी स्वाक्षरीच खोटी असेल तर त्यानियुक्त्याही चुकीच्या आहेत, असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com