रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा मोदींचा प्रयत्न! हेमा मालिनींचा गौप्यस्फोट

रशियाने युक्रेनविरूध्द युध्द पुकारले असून, यावरून मोदींनी थेट पुतीन यांना फोन लावला होता.
Hema Malini and Narendra Modi
Hema Malini and Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : रशियाने (Russia) आता युक्रेनविरुद्ध (Ukraine) युध्द पुकारले असून जोरदार हल्ला सुरू केला आहे. यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केली होती. आता भाजपच्या खासदार अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा उपस्थित केला आहे. (Russia-Ukraine Crisis)

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या प्रचारात आज हेमा मालिनी यांनी युक्रेन-रशिया युद्धाचा मुद्दा आणला. या युद्धात सगळ्यांनात पंतप्रधान मोदींची मध्यस्थी हवी आहे, असे सांगून हेमा मालिनी म्हणाल्या की, मोदींनी आपला देश एवढा पुढे नेला आहे की, सगळ्या जगाला हेवा वाटत आहे. त्यांनी स्वत:चे नाव एवढे मोठे केले आहे की जग त्यांचा आदर करते. आता युक्रेन-रशिया युद्धात त्यांनी मध्यस्थी करून ते थांबवण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. यासाठी सगळे मोदींना विनंती करीत आहेत. ते जगातील मोठे नेते मानले जातात. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.

मोदी यांनी 24 फेब्रुवारीला पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी थेट पुतीन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. युक्रेनमधील हिंसाचार तातडीने थांबवावा, असे आवाहन मोदींनी केले. राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून रशिया आणि युक्रेनने हा वाद सोडवावे, असे मोदींनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत पुतीन यांना युक्रेनसंबंधीच्या सध्याच्या घडामोडींची माहिती मोदींना दिली. रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक चर्चेच्या माध्यमातून सुटतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

Hema Malini and Narendra Modi
आयपीएस रश्मी शुक्लांना दणका! बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी थेट रशियासोबतच्या संघर्षात भारताच्या मध्यस्थीची मागणी केली होती. मोदी आणि व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे संबंध चांगले असल्याचा दाखला त्यांनी दिला होता. ते म्हणाले होते की, मोदी हे जगातील सामर्थ्यवान आणि सन्माननीय नेते आहेत. भारताचे रशियासोबत अतिशय चांगले सामरिक संबंध आहेत. मोदींजींनी पुतीन यांच्याशी संवाद साधल्यास ते नक्कीच प्रतिसाद देतील, अशी आम्हाला आहे. केवळ युक्रेनच्या नागरिकांसाठी नव्हे तर तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारताचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. आम्हाला केवळ राजशिष्टाचाराचे निवेदन नको. आम्हाला सगळ्या जगाकडून पाठिंबा हवा आहे.

Hema Malini and Narendra Modi
चंपा, टरबूज अन्...; राष्ट्रवादीच्या आमदाराची जीभ घसरली

जगातील इतर देशांनाही पुतीन यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. रशियाच्या कारवाईत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केल्यास त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आमच्या नागरिकांना किंवा देशाला हानी पोचवण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या इतिहासात कधीही अनुभवले नसेल एवढे भयानक परिणाम होतील, असे पुतीन यांनी म्हटले आहे. पुतीन यांच्या या भूमिकेमुळे तिसऱ्या महायुध्दाची (World War III) चाहूल लागल्याची भीती सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com