Hemant Soren and Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी हेमंत सोरेन घेणार मोठा निर्णय? ; राजद, काँग्रेसचं टेन्शन वाढलं!

Jharkhand Mukti Morcha on Bihar assembly polls : झारखंड मुक्ती मोर्चाचे केंद्रीय सरचिटणीस व प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी थेट मीडियासमोरच केलं मोठं विधान
JMM hints RJD, Congress
JMM hints RJD, Congresssarkarnama
Published on
Updated on

JMM hints RJD, Congress : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातवरण हळूहळू तापत आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधातील इंडिया आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, इंडिया आघाडीला एक मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. कारण, झारखंड मुक्ती मोर्चाने स्पष्ट केलं आहे की, ते इंडिया आघाडी व्यतिरिक्त स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून बिहार विधानसभा निवडणूक लढवू शकतात.

झारखंड मुक्ती मोर्चाचे केंद्रीय सरचिटणीस व प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी पक्ष कार्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितले की, बिहारमध्ये आमचे स्वतंत्र संघटन आहे आणि आम्ही आमच्या बळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासही सज्ज आहोत.

इंडिया आघाडीने नुकतीच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी आणि जागा वाटपाबाबत चर्चेसाठी दोन बैठकांचे आयोजन केले होते. परंतु या बैठकांसाठी झारखंड मुक्ती मोर्चाला कोणतही निमंत्रण मिळालं नव्हतं. यावरून पक्षाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

JMM hints RJD, Congress
FIR against BJP Workers .. : अखेर पुण्यातील 'त्या' भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; रूपाली चाकणकरांनी दिली माहिती!

यासंदर्भात मीडियाने विचारलेल्या प्रश्नावर पक्षाचे सरचिटणीस भट्टाचार्य यांनी म्हटले की, जर ते आम्हाला बोलवत नसतील, तर आम्ही तिथे जबरदस्ती प्रवेश करणार नाही. आमची स्वतंत्र ओळख आहे आणि आम्ही तिथे आमची ताकद दाखवू, हे निश्चित आहे.

JMM hints RJD, Congress
Akhilesh Yadav - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांनी केली मोठी घोषणा!

याशिवाय भट्टाचार्य यांनी पुढे म्हटले की, आम्ही काँग्रेस व राजदला सांगू इच्छितो की आम्ही त्यांना झारखंडमध्ये आमच्यासोबत ठेवले आणि त्यांना योग्य आदर दिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राजदने झारखंडमध्ये केवळ एक जागा जिंकली होती, मात्र आम्ही त्यांचा एकमेव आमदार पूर्ण पाच वर्षे मंत्रिमंडळात ठेवला. कारण, आम्ही एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो व आम्हाला आघाडी धर्माची पूर्ण जाणीव होती. आता काँग्रेस आणि राजदनेही बिहारमध्ये हाच युती धर्म दाखवला पाहिजे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com