FIR against BJP Workers .. : अखेर पुण्यातील 'त्या' भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; रूपाली चाकणकरांनी दिली माहिती!

Rupali Chakankar Statement on the Legal Action - जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण ; लवकरच आरोपीस चौकशीसाठी बोलावण्यात येणार
Rupali Chakankar
Rupali Chakankarsarkarnama
Published on
Updated on

FIR Filed Against BJP Workers in Pune : पुणे महानगरपालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकारीच्या तक्रारीवरून भाजप पुणे कामगार आघाडीचे अध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी महिलेने या दोघांवर विनाकारण पाठलाग, अश्लील टिप्पणी आणि मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिचा वारंवार पाठलाग करत होते तसेच कार्यालयीन सहकाऱ्यांच्या समोर अश्लील, अवमानकारक शब्दांचा वापर करत होते. या वागणुकीमुळे तिची समाजात बदनामी झाली असून, तिच्या चारित्र्यावरही संशय निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवली आहे आणि. मानसिक तणावामुळे कार्यालयात जाण्याची भीती वाटत असल्याचे संबंधित अधिकारी महिलेने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच लवकरच आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Rupali Chakankar
Dilipkumar Sananda Vs Fundkar : महायुतीत प्रवेशानंतरही आकाश फुंडकरांच्या विरोधात सानंदा न्यायालयात!

दरम्यान याबाबतची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांन एक्स वर पोस्ट करून दिली आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या, पुणे महानगरपालिकेतील महिला कर्मचारीस राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची तक्रार आयोगाकडे आल्यानंतर पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने चौकशी करत कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले होते.

Rupali Chakankar
Ajit Pawar Statement on Dhirubhai - धीरूभाई अंबानी बद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांनी दिलं स्पष्टीकरण अन् थेट..

तसेच आयोगाच्या निर्देशानुसार आयुक्तांनी तातडीने मुख्यालयात आणि इतर कार्यालयात आरोपींना प्रवेश बंदी केली होती. पुणे महापालिकेच्यावतीने पोलिस कारवाई करण्यात येईल असे नमूद करत महापालिकेने त्यांच्या स्तरावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर केला होता. असं चाकणकरांनी सांगितलं.

प्रशासकीय कारवाई नंतर आता पुणे शहर पोलिसांनी देखील याप्रकरणी कार्यवाही करत पीडित महिलेच्या तक्रारीवरून संबंधित राजकीय कार्यकर्ता आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कायद्यानुसार तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com