Hemant Soren on Champai Soren decision : झारखंड मुक्ति मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी, JMMला धक्कदायक अशी भूमिका जाहीर करत, हेमंत सोरेन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ज्यावरून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे.
'भाजपकडून आमदारांची खरेदी, वाटाघाटी केली जात आहे. भाजप समाजात फूट पाडण्याचं काम करत आहे.' असा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरन यांनी केला आहे. त्यांचे हे विधान चंपई सोरेन हे दिल्लीला पोहचल्याच्या काही तासानंतरच आले.
गोड्डा जिल्ह्यात एक शासकीय समारंभास संबोधित करताना हेमंत सोरेन(Hemant Soren) यांनी आरोप केला की, भाजप गुजराता, आसाम आणि महाराष्ट्रातून लोक आणून, आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांमध्ये द्वेष पसरवण्याचं आणि त्यांना एकमेकांविरोधात उभा करण्याचं काम करत आहे.
याचबरोबर भाजपवर(BJP) निशाणा साधताना त्यांनी असंही म्हटलं की, समाजाच तर सोडाच हे लोक(भाजप) कुटुंब आणि पक्ष फोडण्याच काम करतात. हे आमदारांची वाटाघाटी करतात. पैसा अशी गोष्ट आहे की नेत्यांना इकडेतिकडे जायला वेळ लागत नाही.
तसेच 'हेमंत सोरेन यांनी असंही म्हटलं की, झारखंडमध्ये या वर्षी विधानसभा निवडणूक होणे निश्चित आहे. मात्र निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून नव्हे, तर राज्यात विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपकडून ठरवला जातो.'
याशिवाय त्यांनी असाही आरोप केला की, असं वाटतं की निवडणूक आयोग आता घटनात्मक संस्था राहिलेली नाही. कारण, ती आता भाजपच्या लोकांचा ताब्यात गेली आहे. तसेच त्यांनी असेही म्हटले की, मी त्यांना(भाजपला) आव्हान देतो की, आज जर विधानसभा निवडणूक झाली तर झारखंडमधून ते नाहीसे होतील.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.