Hijab Row:हिजाब वादानंतर शाळाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

उद्यापासून (सोमवार) दहावीचे वर्ग सुरु होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai)यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे.
Hijab
Hijab sarkarnama
Published on
Updated on

उडुपी (कर्नाटक) : कर्नाटकात उडुपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब (Hijab)परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हिजाबवरुन वाद सुरु झाला आहे. ''जर ड्रेस कोड लागू असेल तर वेगळा पोशाख घालून येणाऱ्या लोकांना कॉलेजमध्ये बसू दिले जाणार नाही, असे कॉलेजने म्हटले आहे. त्याविरोधात मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अशा प्रकारे हिजाब घालू न देणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे आणि कलम १४ आणि २५ चे उल्लंघन आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात आहे.

हिजाबबाबत सुप्रीम कोर्टानेही आपले म्हणणे मांडले आहे. या सगळ्या पार्श्वभूमी कर्नाटकातील बंद असलेल्या शाळा आता सोमवारपासून सुरु होत आहेत. उद्यापासून (सोमवार) या ठिकाणी दहावीचे वर्ग सुरु होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai)यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. अन्य वर्ग, पदविका, पदवीचे अभ्यासक्रम परिस्थितीचा आढावा घेऊन सुरु करण्यात येईल, असे बोम्मई यांनी म्हटलं आहे. गेल्या सोमवारपासून हिजाबवर या वाद सुरु आहे.

Hijab
कॉग्रेसच्या खासदार पतीसाठी भाजपच्या प्रचारात ; 'कॅप्टन'साठी मते मागणार

या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान देण्यात आले होते. याबाबत सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे याचिकाकर्त्याला मोठा झटका बसला आहे. ''योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल,'' असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. कर्नाटकात काय होत आहे, यावर आमचं लक्ष आहे, हा राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा बनवू नका आणि योग्यवेळी त्यात हस्तक्षेप केला जाईल. हिजाबचा मुद्दा धार्मिक आणि राजकीय बनवू नका, असे सुप्रीम कोर्टनं म्हटलं आहे.

Hijab
हेमामालिनींचा गाल सोडून गुलाबराव पाटलांनी आता ओमपुरींचा गाल पकडला

हिजाबबाबत एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi)यांनी मोठ विधान केलं आहे. रविवारी सकाळी असुद्दीन ओवेसी यांनी याबाबत टि्वट केलं आहे. ''ईशा-अल्लाह एक दिवस हिजाबी पंतप्रधान बनेल, आम्ही आमच्या मुलींना शुभेच्छा देतो, इंशा अल्लाह, जर त्यांच्या अब्बा-अम्मी यांनी ठरवलं तर त्या हिजाब परिधान करेल. अब्बा-अम्मा म्हणतील, 'बेटा परिधान कर, आम्ही बघतो कोण तुला अडवतो. हिजाब, नकाब परिधान करुन कॉलेजमध्ये जाईल. कलेक्टरही बनेल, उद्योगपती बनले, एसडीएमही बनेल एक दिवस पंतप्रधानही होईल,'' असे असुद्दीन ओवेसी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com