Savitri Mandvi
Savitri Mandvi Sarkarnama

शिक्षिकेची नोकरी सोडून निवडणूक लढवली अन्‌ भाजपच्या बड्या नेत्याचा पराभव केला!

छत्तीसगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सावित्री मांडवी यांचा विजय

नवी दिल्ली : शिक्षिकेची (Teacher) नोकरी सोडून छत्तीसगड (Chhattisgarh) विधानसभेची पोटनिवडणूक (ByElection) लढविणाऱ्या सावित्री मांडवी यांनी भाजपचे (BJP) नेते ब्रह्मानंद नेताम यांचा २१ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे भूपेश बघेल मुख्यमंत्री झाल्यापासून काँग्रेस (Congress) छत्तीसगडमध्ये २०१८ पासून एकही पोटनिवडणूक हरलेली नाही. भानूप्रतापपूर मतदारसंघावर काँग्रेसने सलग सातव्यांदा वर्चस्व मिळविले आहे. (Victory of Savitri Mandvi of Congress in Chhattisgarh Assembly by-election)

भानुप्रतापपूर येथील काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे उपसभापती दिवंगत मनोज मांडवी यांच्या पत्नी सावित्री मांडवी या शिक्षिका आहेत. त्या रायपूरच्या कटोरा तालाब येथील सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी शिक्षिकापदाचा राजीनामा दिला. मनोज मांडवी यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी सावित्री मांडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. सावित्री मांडवी यांनी पक्षाचा विश्वास खरा करत सलग सातव्यांदा काँग्रेसला विजय मिळवून दिला आहे.

Savitri Mandvi
शिवरायांच्या अवमानावर बोलणारे अमोल कोल्हेंचा माईक बंद केला : महाराष्ट्रात संतापाची भावना

मनोज मांडवी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत मांडवी, नेताम यांच्याशिवास माजी आयपीएस अधिकारी अकबर राम कोरम इतर चार उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात होते. या कोरम यांनीही चांगली मते मिळविली आहेत. विशेष इतर चार उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मते मिळाली आहेत.

Savitri Mandvi
Himachal Pradesh Election: भाजपचे पाच बडे मंत्री हिमाचलमध्ये पराभवाच्या छायेत!

मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार सावित्री मांडवी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम होती. विशेष सर्व आदिवासी विरोधात होते. सर्व आदिवासी समाजाचे उमेदवार म्हणून अकबर राम कोरम यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी तिसऱ्या क्रमाकांची मते घेतली आहेत. भानुप्रतापपूर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत १३ निवडणुका झाल्या. त्यापैकी सहा वेळा काँग्रेसने बाजी मारली आहे. या मतदारसंघात कोणालही हॅट॒ट्रीक करता आली नव्हती. मात्र, काँग्रेसने तिसऱ्यांदा ही जागा जिंकत हॅट॒ट्रीक केली आहे.

Savitri Mandvi
भाजपला मोठा धक्का : या राज्यांतील सर्व उमेदवार पिछाडीवर!

काँग्रेसच्या नूतन आमदार सावित्री मांडवी म्हणाल्या की, लोकांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. आता लोकांमध्ये जात त्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविणे, पतीची अपूर्ण कामे आणि स्वप्ने पूर्ण करायची आहेत. भानुप्रतापपूरला जिल्हा बनवण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ते भूपेश बघेल सरकारच्या हातात आहे. मात्र, इथल्या जनतेचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com