Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाचे एकूण सहा टप्पे पार पडले आहेत. तर अद्यापही अंतिम सातवा टप्पा बाकी आहे. 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मात्र तत्पुर्वीच सत्ताधीर आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून निकालाबाबत दावे केले जात आहेत. असे असताना आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा(Himanta Biswa Sarma) यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचवाल्या आहेत. शिवाय, राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 370 आणि एनडीए आघाडीसाठी 400 जागांचे उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे. शिवाय पंतप्रधान मोदींनीही अब की बार चारसौ पार असा नारा दिलेला आहे. तर भाजपकडूनही नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनेही भाजपला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप(BJP) पुन्हा सत्तेत दिसणार नाही, असे दावे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केले जात आहे. एकीकडे या घडामोडी सुरू असताना, दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतील, याची तारीखच सांगितली आहे.
हिमंता सरमा म्हणाले, 'भाजप सरकारचा 10 जून रोजी शपथविधी होईल. यानंतर 11 जून रोजी पांडियन यांना परत तामिळनाडूला पाठवायचं आहे.ओडिसाच्या पटकुरामध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार करताना हिमंता सरमा यांनी दावा केला की लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणार आहेत. केवळ निवडणूक निकालाची प्रतीक्षा आहे. 10 जून रोजी भाजप सरकारच शपथविधी होईल.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.