Danish Ali News : 'भाजपला इतिहास-भूगोल माहीत नाही' ; दानिश अलींचा हिमंता बिस्वा सरमांवर हल्लाबोल

Madhya Pradesh Assembly Election : सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.
Himanta Biswa Sarma, Danish Ali News
Himanta Biswa Sarma, Danish Ali NewsSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Election : पूर्वी दररोज दहशतवादी हल्ले होत होते. संसद आणि मुंबईवरही हल्ले झाले आहेत, असे आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले. सरमा यांच्या या वक्तव्यावर बसपा खासदार दानिश अली यांनी त्यांना घेरले आहे. हिमंता सरमा यांची एकतर स्मरणशक्ती कमी आहे किंवा ते हे मुद्दाम बोलत आहेत. 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला तेव्हा भाजपची सत्ता होती, अशा शब्दांत दानिश अली यांनी सरमा यांचा समाचार घेतला.

सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि भाजपकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात आता बसपाचे खासदार दानिश अली यांनीही उडी घेतली आहे. दानिश अली यांनी संसद हल्ल्यावरील वक्तव्यावरून हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांची चांगलीच कोंडी केली.

Himanta Biswa Sarma, Danish Ali News
Solapur Politics: राम सातपुतेंचे अकलूजचे दौरे वाढले; मोहिते पाटलांशी तडजोडीचे प्रयत्न ?

दानिश अली म्हणाले, ''एकतर त्याची स्मरणशक्ती कमकुवत आहे किंवा ते हा मुद्दा मुद्दामून बोलत आहेत. भाजप (BJP) सरकार असताना संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता.'' ''अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते, तर लालकृष्ण अडवाणी देशाचे गृहमंत्री होते. भाजपला इतिहास, भूगोल काहीच कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला. भारताचे सैन्य आधीपासूनच मजबूत आहे. भारतीय सैन्याने 1971 मध्येच पाकिस्तानचे दोन टुकडे केले होते. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिमंता बिस्वा सरमा कुठेच नव्हते.''

आसामचे मुख्यमंत्री काय म्हणाले होते ?

शनिवारी (11 नोव्हेंबर) मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथे निवडणूक रॅलीममध्ये बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते, '2009-10 पर्यंत देशात दररोज बॉम्बस्फोट होत असत. मुंबई आणि संसदेवर हल्ले व्हायचे. त्यावेळी सैन्य नव्हते का ? 'काँग्रेसने पाकिस्तानला धडा शिकवला असता तर हजारो जीव वाचू शकले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेवर आले आणि आपण पाकिस्तानात घुसून दोनदा हल्ले केले.

दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मिझोराममध्ये निवडणुका झाल्या असून छत्तीसगडमध्येही पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये निवडणूक होणार आहे. अंतर्गत सुरक्षेसह अनेक मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Himanta Biswa Sarma, Danish Ali News
MLA Rohit Pawar : रोहित पवारांनी फोडला नवा राजकीय बॉम्ब; 'कर्जत-जामखेड'मध्ये...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com