Patna Opposition Meeting: मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत तुम्ही व्यासपीठ शेअर करणार आहात का? मनसेचा ठाकरेंना प्रश्न; दुहेरी भूमिका कशी?

Sandeep Deshpandes Question to Uddhav Thackeray : हिंदुत्त्व सोडलं आहे का? हे जनतेला सांगा
Patna Opposition Meeting
Patna Opposition MeetingSarkarnama
Published on
Updated on

Patna News Update : बिहारच्या पाटण्यात विरोधी पक्षाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीवरुन पाटण्याच्या रस्त्यावर पोस्टर वॉर रंगले आहे. देशातील १५ विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या नेत्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांचाही समावेश आहे. (sandeep deshpandes question to uddhav thackeray on the meeting of the joint opposition partie)

पाटण्यातील बैठकीला उद्धव ठाकरे आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या उपस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीसी बोलत होते.

Patna Opposition Meeting
Patna 0pposition Meeting : पाटण्यात रंगलयं पोस्टर वॉर ; 'घराणेशाही' विरुद्ध 'मोहब्बत की दुकान'...

"ज्या मेहबुबा मुफ्ती सईद यांच्यासोबत सत्ता स्थापन केली म्हणून तुम्ही आयुष्यभर (भाजपाला) टोमणे मारले, त्या सईद यांच्यासोबत तुम्ही बसणार आहात का? दुसऱ्यांनी केली की ती गद्दारी आणि तुम्ही केलं की ती देशभक्ती अशी दुहेरी भूमिका कशी काय असू शकते?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे . "स्वतःच्या स्वार्थाची वेळ आली की वेगळे निकष आणि इतरांसाठी वेगळे निकष का?” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी ठाकरेंनी केला आहे.

"मेहबुबा मुफ्ती यांनी ३७० कलमाला विरोध केला. त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेसाठी मदत घेणार आहात का? एकत्र येण्यासाठी समान विचाराधारा असावी लागते. परंतु, यांच्यात कुठेही समान विचारधारा सापडत नाहीय. मेहबुबा मुफ्ती सईद यांच्यासोबत आज तुम्ही व्यासपीठ शेअर करणार आहात का? की तेव्हाची भूमिका वेगळी होती, आताची वेगळी आहे? की तुम्ही तुमचं हिंदुत्त्व सोडलं आहे का? हे जनतेला सांगा” असा टोला देशपांडेंनी ठाकरेंना लगावला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु आहे. यात किमान २० भाजपेतर पक्षांचे प्रमुख व नेते सहभागी झाले आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची ही बैठक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

Patna Opposition Meeting
Patna opposition meeting : …तर मोदींना ‘झोला’ खांद्यास लटकवून जावेच लागेल ; विरोधी पक्षाच्या बैठकीवरून ठाकरे गटाचं टीकास्त्र

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठीचे बॅनर लावले आहेत, भाजपने भष्ट्राचारी नेत्यांचे महासंमेलन असे बॅनर लावले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने बॅनर लावले आहे. काँग्रेसकडून "मोहब्बत की दुकान" असा मजकूर लिहिलेले स्वागतचे बॅनर लावण्यात आले आहेत, तर विरोधीपक्षाच्या नेत्यांचे व्यंगचित्र लावण्यात आले आहे.

'मोहब्बत की दुकान' असे लिहिलेली आणि त्यावर राहुल गांधी यांचे मोठे छायाचित्र असलेली स्वागत कमान सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. भाजप-विरोधीपक्षाचे बॅनर वॉर आज पाटण्याच्या रस्त्यावर दिसते आहे. या बॅनरवरुन देशातील राजकारणावरील मिश्किल टोल-टोमणे नागरिकांना अनुभवाला मिळत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com