Home Ministry on Action against Kolkata Police Commissioner and DCP : कोलकाता पोलीस आयुक्त आणि डीसीपींविरोधात केंद्रीय गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल आणि एका डीसीपींविरोधात पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या कार्यालयाची बदनामी करण्याच्या आरोपाखाली शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्यांनी यास दुजारो दिला आहे.
अधिकाऱ्याने पुढे माहीत देताना सांगितलं की, केंद्रीय मंत्रालयाच्या कारवाई पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस(CV Anand Bose) यांच्याकडून विनीत गोयल आणि कोलकाता पोलीस उपायुक्त (डीसीपी) सेंट्रल इंदिरा मुखर्जीशी संबंधित एक रिपोर्ट सादर करण्यात आल्यानंतर झाली, ज्यामध्ये आरोप करण्यात आले आहेत की ते अशाप्रकारे काम करत होते जे एक लोकसेवकासाठी पूर्णपणे चुकीचे आहे.
याशिवाय अधिकाऱ्याने असेही म्हटले की, बोस यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात गृहमंत्रालयाला सोपवलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये या मुद्य्यांवर भर दिला होती की, कोलकाता पोलिसांच्या अधिकाऱ्याने निवडणुकीनंतर राज्यपालांना हिंसाचार पीडितांना भेटण्याची परवानगी दिली नव्हती. केंद्रीय गृहमंत्रालयाने बंगालचे राज्यपाल सीवी आंद बोस यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या एका सविस्तर रिपोर्टच्या आधारे आयपीएस अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.
त्यांनी हेही सांगितले की, यासंबधीचे पत्रर 4 जुलै रोजी राज्य सरकारला पाठवले गेले होते. तसेच, अधिकाऱ्याने हेही सांगितले की, पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राजभवनात तैनात अन्य पोलीस अधिकाऱ्यांवरही एप्रिल-मे 2024 दरम्यान एका महिला कर्मचारीच्या बेछुट आरोपांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. या आयीपएस अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून केवळ राज्यपाल कार्यालयालासच बदनाम केले नाही तर अशाप्रकारे काम केले जे एका लोकसेवकासाठी पूर्णपणे चुकीचे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये लैंगिक शोषणाची हायप्रोफाईल घटना समोर आली. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्यावरच एका महिलेने हे आरोप केले. विशेष म्हणजे ही महिला राजभवनमध्ये काम करणारी आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.