
Pakistan IMF Loan 2025 : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. पाकिस्तान लष्कर आणि त्यांच्या प्रशासनाला खोटारडे म्हणत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला दिलेल्या 1 अब्ज डॉलर्सच्या कर्जाबद्दलही चिंता व्यक्त केली.
हा पैसा दहशतवादाला पोसण्यासाठी वापरला जाईल. पाकिस्तानने त्यांच्या नवीन हल्ल्याला 'बुन्यान-अल-मारसूस' असे नाव दिले असल्यासा गौप्यस्फोट असदुद्दीन ओवैसी यांनी केला. हे नाव कुराण शरीफच्या एका आयतीवरून घेतलं आहे. या आयतीत अल्लाह म्हणतो की जर तुम्ही अल्लाहवर प्रेम करत असाल, तर एका भक्कम भिंतीसारखे उभे राहा, असे या आयतीचा अर्थ असल्याचेही असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.
असदुद्दीन ओवैसी (AIMIM) यांनी पाकिस्तान लष्कराच्या कुरापतींवर संताप व्यक्त करताना, खोटारडे म्हणताना, ते कुराणचा संपूर्ण उद्देश समजूनच शकले नाही, आणि तशी त्यांची इच्छा देखील नाही, असे म्हटले. पूर्व पाकिस्तानात बंगाली मुस्लिमांवर गोळीबार करताना ते भिंतीसारखे उभे राहण्याचे का विसरले? असा प्रश्न देखील त्यांनी केला.
आयएमएफने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिल्याबद्दल ओवेसी यांनी चिंता व्यक्त केली. हे कर्ज म्हणजे, दहशतवादी (Terrorist) संघटनेला दिलेले कर्ज आहे, असे वर्णन केले. पाकिस्तान भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे आणि निधी पुरवत आहे, हे माहित असूनही अमेरिका, कॅनडा आणि जर्मनी गप्प राहिले हे दुर्दैवी आहे, असे ओवेसी यांनी म्हटले. हे पैसे पाकिस्तानमधील गरिबी निर्मूलनासाठी किंवा पोलिओचे प्रमाण कमी करण्यासाठी वापरले जाणार नाहीत. उलट भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी त्याचा वापर केला जाईल, असा गंभीर आरोप ओवैसी यांनी केला.
ओवैसी यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन करताना, पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देण्यापासून रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. पाकिस्तानला दिलेल्या कर्जाचा आयएमएफने पुनर्विचार करावा. कर्जाचे पैसे दहशतवादासाठी वापरले जाणार नाहीत याची खात्री करावी, असेही ते म्हणाले.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "पाकिस्तान हे सहज विसरतो की, भारतात 23 कोटींहून अधिक मुस्लिम राहतात. या मुस्लिमांनी आपल्या पूर्वजांनी जिन्नांनी मांडलेला 'द्विराष्ट्र सिद्धांत' नाकारला आणि आपण भारताला आपला देश म्हणून स्वीकारले आणि आपण येथेच राहू. पाकिस्तानला धर्माच्या नावाखाली भारताचे विभाजन करायचे आहे, ते भारतीय मुस्लिम, हिंदू आणि इतर समुदायांमध्ये तणाव निर्माण करायचे आहेत". जेव्हा ते 'द्विराष्ट्र सिद्धांता'बद्दल बोलतात तेव्हा ते अफगाणिस्तानच्या सीमा चौकीवर बॉम्बस्फोट का करत आहेत, ते इराणी सीमा चौकीवर बॉम्बस्फोट करतात, पाकिस्तानचे डीप स्टेट आपल्या सर्व बेकायदेशीर कारवाया लपविण्यासाठी इस्लामचा मुखवटा म्हणून वापर करतात, असेही ओवैसी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.