Sakshi Malik : कुस्ती महासंघ अध्यक्षांच्या निवडीनंतर साक्षी मलिकने टाकला शेवटचा ‘डाव’

Wrestling Federation : अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड...
Brij Bhushan Sharan Singh, Sakshi Malik
Brij Bhushan Sharan Singh, Sakshi MalikSarkarnama
Published on
Updated on

BJP MP Brij bhushan Singh : भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दंड थोपटून उभ्या ठाकलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरूवारी मोठा निर्णय घेतला. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिंह यांचे निकटवर्तीय निवडून आल्याने साक्षीने कुस्तीला रामराम ठोकला. हा निर्णय जाहीर करताना तिला रडू आवरत नव्हते. यावेळी तिच्यासोबत इतर कुस्तीपटू होते.

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी गुरूवारी संजय सिंह (Sanjay Singh) यांची निवड झाली आहे. त्यांनी कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेत्या अनिता शेरॉन (Anita Sheoran) यांचा पराभव केला. संजय सिंग यांना 47 पैकी 40 मते मिळाली. ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप करत दिल्लीत अनेक दिवस आंदोलन केलेल्या कुस्तीपटूंनी शेरॉन यांना पाठिंबा दिला होता. (Wrestling Federation of India Election)

Brij Bhushan Sharan Singh, Sakshi Malik
Maratha Reservation : गोखले इन्स्टिट्यूट वास्तव मांडणार की फडणवीस सांगतील तेच?

संजय सिंग हे ब्रिजभूषण यांचे बिझनेस पार्टनर असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे कुस्ती महासंघाची कमान ब्रिजभूषण यांच्याच हातात राहणार असल्याची चर्चा आहे. ते महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष होते. या निवडणुकीनंतर साक्षी मलिक व बजरंग पुनिया यांनी पत्रकार परिषदेत घेतली. क्रीडा मंत्रालयाने लैंगिक छळाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयांना निवडणुकीत सहभागी होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. पण पाळण्यात आले नाही, असा आरोप साक्षीने यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष राहिलेले संजय सिंह हे ब्रिजभूषण यांचा उजवा हात आहे. आम्ही चाळीस दिवस रस्त्यावर झोपलो. देशभरातून अनेक लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतरही जर ब्रिजभूषण यांचा बिझनेस पार्टनर आणि घनिष्ट मित्र अध्यक्ष म्हणून निवडून येत आहे. त्यामुळे मी कुस्ती सोडत आहे, असे साक्षीने यावेळी जाहीर केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण कुस्ती खेळू शकत नाही, असेही ती म्हणाली. पत्रकार परिषदेनंतर ती रडतच बाहेर पडली.

दरम्यान, निवडणुकीनंतर संजय सिंह हे काही वेळातच ब्रिजभूषण सिंह यांना भेटण्यासाठी गेले होते. दोघांचेही यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. महासंघाने तातडीने काही स्पर्धा आयोजित कराव्यात. अनेक दिवसांपासून त्या झाल्या नाहीत. अन्यथा अनेक कुस्तीपटूंचे नुकसान होईल, असा सल्लाही सिंह यांनी नवीन अध्यक्षांना दिला.

 (Edited By - Rajanand More) 

Brij Bhushan Sharan Singh, Sakshi Malik
Parliament Winter Session : पंतप्रधान लोकसभेत आले, बसले, उभे राहिले आणि गेले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com