Delhi News : देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. लाल किल्ल्यावरही स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फडकवण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशवासीयांना संबोधित केले. लोकसभेच्या 2024 निवडणुकींच्या अनुषंगाने मोदी यांनी लाल किल्ल्यावरून अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून पंतप्रधानपदाची हॅट्रीक साधणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचविले आहे. (Latest Marathi News)
नरेंद्र मोदी म्हणाले, "2047 सालीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षे ही सर्वात मोठी संधी आहे. पुढच्या वर्षीच्या 15 ऑगस्टच्या दिवशी मी याच लाल किल्ल्यावरून देशाने मिळवलेले यश देशवासीयांपुढे मांडणार आहे. 15 ऑगस्टला मी पुन्हा येईन. मी फक्त देशवासीयांसाठी जगतो, परिश्रम करतो, कारण पूर्ण देश माझा परिवार आहे."
दोन कोटी महिलांना लखपती बनवणार-
"आपल्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. आज भारत जगाला अभिमानाने सांगू शकतो की, सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहेत. 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महिला शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करत आहोत," असे मोदी म्हणाले.
मणिपूरवर भाष्य -
नरेंद्र मोदी म्हणाले, "मणिपूरमध्ये मागील दोन- तीन महिने हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता मात्र मणिपूरमध्ये शांतता आहे. राज्य आणि केंद्र सरकार समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. यापुढेही राज्याला उभारी देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.