Sharad Pawar News : नऊ वर्षात तुम्ही काय केले ? ; मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारवर शरद पवार भडकले...

Sharad Pawar Slams PM Modi : तीस वर्षापूर्वी काय झाले यापेक्षा..
sharad pawar,pm modi
sharad pawar,pm modisarkarnama
Published on
Updated on

Baramati : मणिपूरसह ईशान्य भारताचा विकास तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी होऊ दिला नाही,असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या अधिवेशनात केला. मणिपूरच्या परिस्थितीचे खापर मोदींनी काँग्रेसवर फोडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मणिपूर प्रश्नांवरून सरकारला रोखठोक सवाल केला. "काँग्रेसच्या कार्यकाळात तीस वर्षापूर्वी काय घडलं हे आता कशाला सांगता ? नऊ वर्षात तुम्ही काय केले हे सांगा," असा सवाल पवारांनी मोदी सरकारला केला. बारामतीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

sharad pawar,pm modi
Sudhir Tambe News: मोठी बातमी : डॉ. सुधीर तांबेंचे निलंबन लवकरच मागे घेणार ; नगर जिल्हा काँग्रेसकडून हिरवा कंदील.

"काँग्रेस मणिपूरच्या प्रश्नांमध्ये राजकारण करीत आहे, असा आरोप सत्ताधारी करतात, मात्र तीस वर्षापूर्वी काय झाले यापेक्षा नऊ वर्षांपासून तुमच्याकडे सत्ता आहे, जर काँग्रेसने काहीही केले नसेल तर तुम्हाला सत्ता दिली होती, मग या नऊवर्षामध्ये तुम्ही काय केले हे मात्र ते सोयीस्कर विसरत आहेत. मणिपूरचा प्रश्न मणिपूरपुरता मर्यादीत नाही. हा चिंताजनक प्रश्न आहे, सरकार याकडे लक्ष दिले पाहिजे," असे पवार म्हणाले.

sharad pawar,pm modi
Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा ; महाविकास आघाडीत संघर्ष होणार ?

त्या गुप्त भेटीबाबत संभ्रम निर्माण करू नका..

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली . "त्या गुप्त भेटीबाबत संभ्रम निर्माण करू नका," असे पवारांनी सांगितले. महाविकास आघाडीत कोणताही संभ्रम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आघाडीत एकी आहे. कोणताही संभ्रम नाही. काल सोलापूरला असताना या सर्व गोष्टी आम्ही स्पष्ट केलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा पत्रकारांनी याबाबत संभ्रम वाढवण्याची गरज नाही," असे ते म्हणाले.

राज्य कुठल्या दिशने जात आहे?

ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर पवार म्हणाले, "ठाण्यातील हा प्रकार चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात असा प्रकार होत असेल तर राज्य कुठल्या दिशने जात आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याला जबाबदार असलेल्या दोषीवर सरकारने कारवाई करावी,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com