Mamata Banerjee: निवडणुकीपूर्वी ममतादीदींनी खेळलं बंगाली कार्ड; मुख्य सचिवपदी पहिल्यांदा महिला अधिकारी

West Bengal Chief Secretary Nandini Chakraborty News:नंदिनी चक्रवर्ती यांनी राज्यात अनेक मोठ्या पदावर काम केले आहे. गृह सचिव, राज्यपाल सीवी आनंद बोस यांच्या मुख्य सचिव, पर्यटन विभागाच्या मुख्य सचिव आदी पदावर त्यांनी काम केले आहे.
Mamata Banerjee: निवडणुकीपूर्वी ममतादीदींनी खेळलं बंगाली कार्ड; मुख्य सचिवपदी पहिल्यांदा महिला अधिकारी
Published on
Updated on

कोलकाता: विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी महिला सनदी अधिकारी विराजमान झाल्या आहे. पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

1994च्या बँचच्या आयएएस अधिकारी असलेल्या नंदिनी चक्रवर्ती यांनी पदभार स्वीकारला आहे. या पदासाठी स्पर्धेतील आठ बड्या सनदी अधिकाऱ्यांना मागे टाकत नंदिनी यांनी या पदावर बाजी मारली आहे. राज्य प्रशासकीय विभागात यानिमित्ताने मोठा बदल होत असल्याचे चित्र आह

राज्याचे मुख्य सचिव मनोज पंत हे सेवानिवृत्त झाले आहेत. मनोज पंत यांना सरकारने सहा महिने मुदतवाद दिली होती. त्यांच्या जागी आता नंदिनी चक्रवर्ती यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नियुक्ती केली आहे. ममतादिदी यांच्या निकटवर्तीय म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची ओळख आहे. राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

2023 मध्ये त्यांनी राज्याच्या गृह विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे. नंदिनी चक्रवर्ती यांनी राज्यात अनेक मोठ्या पदावर काम केले आहे. गृह सचिव, राज्यपाल सीवी आनंद बोस यांच्या मुख्य सचिव, पर्यटन विभागाच्या मुख्य सचिव आदी पदावर नंदिनी चक्रवर्ती यांनी काम केले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे.

1 जून 1969 रोजी जन्मलेल्या नंदिनी या मुळच्या पश्चिम बंगालच्या आहेत.त्यांनी भूगोल या विषयात एमए पदवी संपादन केली आहे. नंदिनी चक्रवर्ती या जाधवपुर यूनिवर्सिटीच्या विद्यार्थींनी आहेत. बंगालमध्ये भाषिक मुद्या चर्चेत असताना नंदिनी चक्रवर्ती यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करुन ममता बॅनर्जी यांनी अनेक संकेत दिले आहेत. नंदिनी या सामान्यपणे नेहमीच बंगाली भाषेतच संभाषण करीत असतात. त्यांची या पदी नियुक्ती करुन ममतादिदींनी मोठा राजकीय डाव खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Mamata Banerjee: निवडणुकीपूर्वी ममतादीदींनी खेळलं बंगाली कार्ड; मुख्य सचिवपदी पहिल्यांदा महिला अधिकारी
Nitin Gadkari News: नितीन गडकरींच्या बालेकिल्ल्यात दोघांना एबी फॉर्म; भाजप काय निर्णय घेणार ?

राज्य सरकारने नंदिनी चक्रवर्ती यांच्या जागी जगदीश प्रसाद मीणा यांची नियुक्ती केली आहे. यंदा मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी तृणमूल काँग्रेस जोरदार प्रयत्न करीत आहे. नंदिनी चक्रवर्ती यांच्या माध्यमातून ममतादिदींनी बंगाली अस्मिता कार्ड खेळले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com