Nitin Gadkari News: नितीन गडकरींच्या बालेकिल्ल्यात दोघांना एबी फॉर्म; भाजप काय निर्णय घेणार ?

Nagpur Mahapalika Election 2025 BJP Faces AB Form Controversy:प्रभाग १८ मध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा वाडा आहे. प्रबळ दावेदार सुधीर राऊत हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. गडकरी यांच्याच आशीर्वादाने त्यांनी नागपूर महापालिकेत पाऊल ठेवले.
Nagpur Mahapalika Election 2025
Nagpur Mahapalika Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागण्यासाठी भाजपकडे अभूतपूर्व गर्दी झाली होती. दीडशे जागा असताना सुमारे अठराशे कार्यकर्त्यांनी दावेदारी केली होती. त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचे कोणाला नाकारायचे असा पेच पक्षासमोर निर्माण झाला होता. काही प्रभागांमध्ये एकाच जागेवर दोन प्रबळ दावेदार होते.

शेवटी कोणालाही नाराज करायचे नसल्याने भाजपने नागपूर शहरातील चार प्रभागांमध्ये दोघांना एबी फॉर्म दिले होते. आता यातून कोण माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियमानुसार ज्या उमेदवाराने आधी फॉर्म भरला त्याचा अर्ज स्वीकारला जातो. मात्र भाजप कोणाला विड्रॉल करायला भाग पाडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

१८ आणि २२ या दोन प्रभागात उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस आहे. प्रभाग १८ मध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा वाडा आहे. प्रबळ दावेदार सुधीर राऊत हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. गडकरी यांच्याच आशीर्वादाने त्यांनी नागपूर महापालिकेत पाऊल ठेवले. ते स्थायी समितीचे सभापतीसुद्धा होते. मात्र मागील निवडणुकीत त्यांचा धक्कादायक पराभव झाला. या प्रभागातील तीन नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. राऊत हे त्यास अपवाद ठरले होते. काँग्रेसचे युवा नेते बंटी शेळके यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला होता.

राऊत यांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी देण्यास त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी विरोध दर्शवला होता. त्यांच्याऐवजी पत्नीला लढवावे असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. मात्र राऊत मानले नाहीत. या प्रभागात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. याचाही फटका राऊत यांना बसला होता. यावेळी बंडू राऊत यांनी पुन्हा एकदा ओबीसी प्रवर्गातून दावेदारी दाखल केली आहे. त्यांनी भाजपने एबी फॉर्म दिला आहे. यासोबतच धीरज चव्हाण यांनाही भाजपने एबी फॉर्म दिला आहे.

मागील निवडणुकीतच चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा शब्द भाजपने दिला होता. आता पुन्हा दोघांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. राऊत यांनी चव्हाण यांच्या आधी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने कोणालाच विड्रॉल करायला सांगितले नाही तर राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. अशीच चुरस मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये आहे. श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य यांच्यापैकी कोणाला नंबर लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागल्या निवडणुकीत या दोघांच्या उमेदवारीवरून मोठा राडा झाला होता.

श्रीकांत आगलावे यांना तिकीट जाहीर झाले होते मात्र त्यांना भाजपच्या काही काही कार्यकर्त्यांनी मोठा विरोध केला होता. आपसातील भांडणे बघून शेवटी नितीन गडकरी यांनी दोघांचाही पत्ता कापला होता. त्यांच्याऐवजी मनोज चाफले यांना उमेदवारी दिली होते. ते निवडूनसुद्धा आले. यावेळी चाफले यांना विश्रांती देऊन भाजपने पुन्हा आगलावे आणि आचार्य या दोघांना एबी फॉर्म देऊन आपसात झुंजवणार आहे. विशेष म्हणजे दोघेही यापूर्वी बजरंगदलाचे कार्यकर्ते होते. आगलावे यांनी आधी उमेदवारी दाखल केली असल्याचे समजते.

Nagpur Mahapalika Election 2025
Nagpur Mahapalika Nivadnik: पती माघार घेईना; भाजपच्या माजी महापौरांनी गाठलं माहेर! तिकीटामुळे संसारात फूट

भाजपने प्रभाग क्र. १३-ब (अनुसूचित जाती महिला) येथून ऋतिका मसराम व रूपाली राजेश वरठी प्रभाग क्र. ३१-ड (खुला प्रवर्ग महिला) येथून मानसी निखिल शिमले व अंबिका महेश महाडीक या दोन महिलांना एबी फॉर्म दिला आहे. महाडीक हे शिवसैनिक आहे. पाच वर्षांपूर्वी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी त्यांना भाजपात आणले होते.

प्रभाग क्र. ३८-ब (ओबीसी महिला) येथून प्रतिभा विनोद राऊत व स्वप्ना हिरणवार यांना एबी फार्म देण्यात आले आहे. त्यामुळे २ जानेवारी रोजी यांच्यापैकी नेमके काेण उमेदवारी अर्ज मागे घेते याकडे लक्ष लागले आहे. भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार ज्याने आधी उमेदवारी दाखल केली त्याची कायम ठेवण्यात येणार असल्याचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com