Pooja Khedkar: पूजा खेडकर यांना 'या' तारखेपर्यंत अटक करता येणार नाही, कोर्टानं सांगितले कारण...

IAS Pooja Khedkar Updates Anticipatory Bail Hearing Delhi High Court: उच्च न्यायालायने पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. खोटी कागदपत्र दाखवत यूपीएससीची फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे.
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

बडतर्फ प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकर यांना अटक करु नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. खोटी कागदपत्र दाखवत यूपीएससीची फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर आहे.

याप्रकरणी खेडकर यांच्यावर बडतर्फीची कारवाईही झाली आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी पटियाळा हाऊस न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालायने पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. याप्रकरणाची आज सुनावणी झाली. हे प्रकरण विचाराधीन असताना पूजाला तत्काळ अटक करण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाने म्हटलं होते. कोर्टाने दिल्ली पोलिस आणि UPSC ला नोटीस पाठवून उत्तर मागवलं होत. आज या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली नाही.

नागरी सेवा परीक्षेत परवानगीपेक्षा जास्त संधी मिळविण्यासाठी स्वत:ची खोटी ओळख करून दिल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे. युपीएससीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दिल्लीमध्ये पूजा खेडकर यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

त्यामुळे पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता होती. यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आज होणाऱ्या सुनावणीवेळी कोर्ट पूजाचा अटकपूर्व जामीन मंजूर करणार की फेटाळणार याकडे सगळ्याचे लक्ष होते.

UPSC ने 20 ऑगस्ट रोजी आपल्या प्रतिज्ञापत्रात प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ आवश्यक आहे, असे खेडकर यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले.

Pooja Khedkar
Samarjit Ghatge: समरजित घाटगे फडणवीसांची साथ सोडणार? मुश्रीफांच्या घरासमोरच 'तुतारी' फुंकणार

UPSC ने प्रतिज्ञापत्र म्हटलं आहे की...

दिल्ली उच्च न्यायालयात UPSC ने प्रतिज्ञापत्र दाखल केले. UPSCच्या वकीलांनी पूजाच्या जामिनाला विरोध केला . पूजाला जामीन देऊ नये, तिला ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे. पूजाने बनावट कागदपत्रे तयार करून २०२२ च्या IAS परीक्षेत निवड होण्यासाठी कोणाची मदत घेतली, हे अटक केल्यानंतरच कळू शकेल. त्यामुळे या प्रकरणात आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी चौकशी करणे गरजेचे आहे, असे UPSC ने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com