धनखड उपराष्ट्रपती झाल्यास मुख्तार अब्बास नक्वी होणार पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल?

Jagdeep Dhankhad | Mukhtar Abbas Naqvi | भाजपचे संख्याबळ असल्याने धनखड यांचे पारडे जड
Jagdeep Dhankhar | Mukhtar Abbas Naqvi
Jagdeep Dhankhar | Mukhtar Abbas Naqvi Sarkarnama
Published on
Updated on

Jagdeep Dhankhad | Mukhtar Abbas Naqvi

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) हे एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार (Vice President candidate) असतील, अशी माहिती भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

उपराष्ट्रपतीपदासाठी माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, सुरेश प्रभू, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान अशी काही नाव चर्चेत होती. मात्र भाजपकडून धनखड यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै असून ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. २०१७ मध्ये भाजपने तत्कालीन केंद्रीय मंत्री वैकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती.

संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपचे संख्याबळ असल्याने धनखड यांचे पारडे जड मानले जात आहे. दरम्यान आता धनखड उपराष्ट्रपती गेल्यास पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल कोण असणार असा सवाल विचारला जात आहे. या नावासाठी माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची चर्चा सुरु झाली आहे.

नक्वी हे मागील वेळी झारखंडमधून राज्यसभेवर (Rajya Sabha) गेले होते. या दरम्यान त्यांची राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशामध्ये पार पडलेल्या २ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांपैकी एका जागेवर उतरवले जाण्याची शक्यता होती. पण ही शक्यता फोल ठरली. पुढे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांना संधी मिळू शकते अशीही चर्चा झाली होती.

Jagdeep Dhankhar | Mukhtar Abbas Naqvi
ममता बॅनर्जींचे टेन्शन हलके? : राज्यपाल जगदीप धनकड भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

परंतु नक्वी यांना कुठेही संधी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचाही राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर होते. मात्र आता उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचीही घोषणा झाल्याने ६४ वर्षीय नक्वी यांचे नाव राज्यपाल पदासाठी सुरु झाले आहे.

धनखड मागील ३ वर्षांपासून पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. मात्र या तिथल्या काळात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे फारसे सख्य जमले नव्हते. सातत्याने राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद पाहायला मिळाला होता. दोघांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर वादाच्या ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण कायमच देशाच्या पटलावर चर्चेचा विषय ठरले होते. धनखड यांनीही सरकार आपले ऐकत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com