Jagdeep Dhankhar | Vice President candidate
Jagdeep Dhankhar | Vice President candidatesarkarnama

ममता बॅनर्जींचे टेन्शन हलके? : राज्यपाल जगदीप धनकड भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Jagdeep Dhankhar | Vice President candidate : धनखड मागील ३ वर्षांपासून पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत
Published on

Jagdeep Dhankhar | Vice President candidate

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) हे एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार (Vice President candidate) असतील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यापूर्वी उपराष्ट्रपतीपदासाठी माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, सुरेश प्रभू, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान अशी काही नाव चर्चेत होती. मात्र भाजपकडून धनखड यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै असून ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. 2017 मध्ये भाजपने तत्कालीन केंद्रीय मंत्री वैकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती.

धनखड मागील ३ वर्षांपासून पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. मात्र या तिथल्या काळात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे फारसे सख्य जमले नव्हते. सातत्याने राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद पाहायला मिळाला होता. दोघांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर वादाच्या ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण कायमच देशाच्या पटलावर चर्चेचा विषय ठरले होते. धनखड यांनीही सरकार आपले ऐकत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com