विरोधकांची एकजूट झाली तर भाजपचा पराभव अटळ!

Soniya Gandhi : लालू यादव आणि नितीश कुमारांना घेतली सोनिया गांधींची भेट, मोदी सरकारविरोधात एकजूटीच्या हालचाली
Nitish kumar
Nitish kumar Sarkarnama

दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची भेट घेतली. विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमार, लालू यादव, गांधी यांची ही पहिलीच भेट आहे. 2024 च्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न म्हणून, या भेटीकडे पाहिले जात आहे.

सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'आम्ही सोनिया गांधींसोबत चर्चा केली. देशातील विविध विरोधी पक्षांना एकत्र करून विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा आमचा विचार आहे, असे ते म्हणाले. या भेटीमुळे भाजप विरोधी पक्षांमध्ये आशेचे चित्र निर्माण झाले आहे. 2024 च्या पार्श्वभूमीवर विविध राज्यातल्या विरोधी पक्षांची एकजूट निर्माण झाली तर भाजपसाठी कठीण जाणार आहे. विरोधकांच्या एकजूटीने 2024 ला 272 संख्यांपर्यंत पोहचण्याचा मार्ग सुकर राहणार नाही. अॅन्टी इन्कम्बन्सी आणि विरोधी एकतेने भाजपचा पराभव अटळ मानण्यात येतो.

Nitish kumar
काही लोक नौटंकी करत आहेत : फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

नितीश कुमार यांच्या नावासाठी काँग्रेसने सहमती दाखवावी -

सूत्रांच्या माहितीवरून एएनआयने या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, आजची बैठक केवळ विरोधी एकजूट मजबूत करण्यासाठीच नाही, तर इतर अनेक विषयांसाठी देखील महत्त्वाची आहे. लालू प्रसाद यादव विरोधकांची एकजूट मजबूत करण्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडून सकारात्मक भूमिकेची अपेक्षा केली आहे. दुसरीकडे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांमधले दुवा बनतील.

तीन पक्षांची पाच वर्षांतील पहिली बैठक -

काँग्रेस, जेडी(यू) आणि आरजेडी या तीन महत्वाच्या पक्ष प्रमुखांची गेल्या पाच वर्षांतील ही पहिली अधिकृत बैठक आहे. या बैठकीत नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांची एकजूट करण्याच्या 2024 च्या मोहिमेला धार मिळू शकते. एनडीएशी फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार आणि सोनिया गांधी यांच्यातील ही पहिली भेट आहे.

Nitish kumar
Narendra Modi : चंदिगड विमानतळाला आता भगत सिंगांचे नाव : पंतप्रधानांची घोषणा!

आणखी अनेक पक्षांशी बोलणी सुरू -

लालू यादव आणि नितीश कुमार हे तेलंगणातील तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), हरियाणात इंडियन नॅशनल लोक दल (INLD), आंध्र प्रदेशात YRS काँग्रेस पार्टी, अखिलेश यादव यांच्याशिवाय बहुजन समाज पार्टी (BSP), समाजवादी पक्ष ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दल आणि जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) आणि नॅशनल कॉन्फरन्सशी चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे.

इंडियन नॅशनल लोक दलच्या रॅलीत दिग्गजांचा सहभाग -

रविवारी हरियाणातील फतेहाबाद येथे इंडियन नॅशनल लोक दल (INLD) च्या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक विरोधी नेते एका मंचावर आले होते. विरोधी पक्षातील नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणे म्हणजे 'विरोधक एकता' मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. रॅलीत सहभागी झाल्यानंतर नितीश कुमार हे सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com